
11 जून, 2024 चालू घडामोडी

अर्थ केअर उपग्रह :
Subject : सामान्य विज्ञान (Science and Technology)
• हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी द्वारे (ESA) अर्थ केअर उपग्रह प्रक्षेपित केला गेला.
• ही मोहीम ESA आणि जपानी अंतराळ संस्थान JAXA यांच्यातील सहकार्य आहे.
• उद्देश्य : ढगांची निर्मिती आणि वातावरणातील एरोसोलची घनता पृथ्वीच्या तापमानावर कसा परिणाम करते याचा अभ्यास हा उपग्रह करेल.

शांग्रीला संवाद : 2024
Shangri-La Dialogue : 2024
Subject : International relation - आंतरराष्ट्रीय परिषद
• आशिया-पॅसिफिक प्रदेशातील प्रमुख संरक्षण बैठक, शांग्रीला संवाद किंवा आशियाई सुरक्षा शिखर परिषदेची (Asian security Summit) 21 वी आवृत्ती सिंगापूर मध्ये नुकतीच पार पडली.
• सिंगापूर मधील शांग्रीला हॉटेल हे संमेलनाचे कायमस्वरूपी ठिकाण आहे म्हणून ही शिखर परिषद शांग्रीला संवाद (Shangri-La Dialogue) म्हणूनही ओळखली जाते.
• शांग्रीला संवादाचे / आशियाई सुरक्षा परिषदेचे श्रेय ब्रिटिश रणनीतीकार सर जॉन चिपमन यांना दिले जाते.
• 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांग्रीला संवादाला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान होते.
परिषदेचे महत्त्व :
• हा संवाद आशिया-पॅसिफिकमधील सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यासाठी, द्विपक्षीय चर्चेत गुंतवण्यासाठी आणि नवीन दृष्टिकोन ओळखण्यासाठी संरक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि गैरसरकारी भागधारकांसह सुरक्षा तज्ञांना एकत्र आणतो.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
बातम्यांमध्ये : नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आणखी तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सहाय्य प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
Subject : सरकारी योजना
प्रधानमंत्री आवास योजना :
• लॉन्च तारीख : 25 जून 2015
• मंत्रालय : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
• उद्देश : शहरी आणि ग्रामीण गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे.

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे अर्थ केअर उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला ?
1. ISRO
2. NASA
3. ESA
4. यांपैकी नाही
उत्तर : ESA
हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी द्वारे (ESA) अर्थ केअर उपग्रह प्रक्षेपित केला गेला.
प्रश्न) शांग्रीला संवादा बाबत खालील विधाने विचारात घ्या
1) शांग्रीला संवादाला आशियाई सुरक्षा शिखर परिषद म्हणूनही ओळखले जाते.
2) 21 व्या शांग्रीला संवाद २०२४ चे आयोजन भारतात करण्यात आले.
3) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांग्रीला संवादाला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे/आहेत.
1. 1 आणि 2
2. 1 आणि 3
3. 2 आणि 3
4. 1,2 आणि 3
उत्तर : 1 आणि 3
• आशिया-पॅसिफिक प्रदेशातील प्रमुख संरक्षण बैठक, शांग्रीला संवाद किंवा आशियाई सुरक्षा शिखर परिषदेची (Asian security Summit) 21 वी आवृत्ती सिंगापूर मध्ये नुकतीच पार पडली.
• 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांग्रीला संवादाला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहे.