
17, जून 2024 चालू घडामोडी

ज्युनिअर हॉकी विश्वचषक : 2025
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणता देश जुनिअर हॉकी विश्वचषक 2025 चे यजमानपद भूषवणार आहे ?
1. भारत
2. स्पेन
3. जर्मनी
4. मलेशिया
उत्तर : भारत

• 2025 मधील पुरुषांच्या ज्युनिअर हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.
• यापूर्वी तीन वेळा 2013, 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारताने केले होते.
• 2016 ची ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली होती.
• ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच 24 संघ सहभागी होणार आहेत.
• स्पर्धेची मागील आवृत्ती 2023 मध्ये क्वालालंपूर (मलेशिया) येथे आयोजित करण्यात आली होती.
• 2023 ची स्पर्धा जर्मनीने जिंकली होती.
पोर्टेबल ऑप्टिकल अणु घड्याळ
Portable Optical Atomic Clock
Subject : GS - सामान्य विज्ञान (Science and Technology)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा
1. नुकतेच विकसित केलेले पोर्टेबल ऑप्टिकल अणु घड्याळाचा उपयोग समुद्रातील अचूक वेळ सांगण्यासाठी होणार आहे.
2. ऑप्टिकल अणु घड्याळांमध्ये स्ट्रोंटियम (Sr) हा अणु वापरला जातो.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य

नुकत्याच नेचर या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात वैज्ञानिकांनी जहाजांवर वापरण्यासाठी पोर्टेबल ऑप्टिकल अणु घड्याळाचा नवीन प्रकार सादर केला.
अणु घड्याळ म्हणजे काय ?
• अणु घड्याळ हे प्रगत टाईमकिपिंग डिव्हाईस आहे.
• अणु घड्याळ साधारण घड्याळापेक्षा अधिक अचूकपणे वेळ मोजते.
• अणु घड्याळ वेळ मोजण्यासाठी अणूंच्या नैसर्गिक कंपनांचा वापर करते.
अणु घड्याळ कोणी विकसित केले ?
लुईस एसेन यांनी 1955 मध्ये अणु घड्याळ विकसित केले.

भारतात अणु घड्याळे आहेत का ?
भारतात अहमदाबाद आणि फरीदाबाद येथे अणु घड्याळे कार्यरत आहे.
ऑप्टिकल अणु घड्याळ आणि अणु घड्याळात काय फरक असतो ?
• ऑप्टिकल अणु घड्याळ हे अणु घड्याळांपेक्षाही अधिक अचूक असतात.
• ऑप्टिकल अणु घड्याळांमध्ये स्ट्रोंटियम (Sr) हा अणु वापरला जातो.
आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी
I Have the Streets : A Kutti Cricket Story
Subject : GS - पुस्तके आणि लेखक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच प्रदर्शित झालेले " आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी " हे आत्मचरित्र कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आहे ?
1. सौरभ गांगुली
2. सचिन तेंडुलकर
3. युवराज सिंग
4. रविचंद्रन अश्विन
उत्तर : रविचंद्रन अश्विन
• अलिकडेच भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने लेखक सिद्धार्थ मोंगा यांच्या सहकार्याने आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र लिहिले आहे.
• कुट्टी स्टोरी याचा अर्थ छोटीशी गोष्ट असा होतो.

काही महत्त्वाचे क्रिकेटपटू आणि त्यांची पुस्तके पुढील प्रमाणे :
• सचिन तेंडुलकर - प्लेइंग इट माय वे
• कपिल देव - 1) क्रिकेट माय स्टाईल, 2) स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट : अॅन ऑटोबायोग्राफी
• सौरभ गांगुली - अ सेंच्युर इज नॉट इनफ
• रवी शास्त्री - स्टारगेझिंग : द प्लेयर्स इन माय लाईफ
• राहुल द्रविड - द वॅाल
• युवराज सिंग - द टेस्ट ऑफ माय लाईफ
• व्ही. व्ही. एस. लक्ष्मण - 281 अँड बियॅाण्ड
• सुरेश रैना : बिलिव्ह : व्हॅाट लाईफ अँड क्रिकेट टॅाट मी
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या आत्मचरित्राचे शीर्षक " प्लेइंग इट माय वे " आहे ?
( महाराष्ट्र पोलीस भरती, SSC MTS 2020)
1. रवी शास्त्री
2. सचिन तेंडुलकर
3. कपिल देव
4. सौरभ गांगुली
उत्तर : सचिन तेंडुलकर
प्रश्न) 281 अँड बियॅाण्ड हे कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे ?
(SSC 2022)
1. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
2. सौरभ गांगुली
3. सचिन तेंडुलकर
4. कपिल देव
उत्तर : व्ही. व्ही. एस. लक्ष्मण