महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव
Maharashtra's 1st Woman Chief Secretary
महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे
Subject : GS- नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे ?
1. सुधा मूर्ती
2. रश्मी शुक्ला
3. सुजाता सौनिक
4. सोनिया सेठी
उत्तर : सुजाता सौनिक

1987 बॅचच्या IAS अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव (Chief Secretary of Maharashtra) पदी नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांबद्दल थोडक्यात माहिती :
• सुजाता सौनिक या मूळच्या हरियाणाच्या आहेत.
• त्यांचे शालेय शिक्षण चंदिगड मधून पूर्ण झाले आहे.
• त्यांनी पंजाब मधून इतिहास या विषयातून आपले MA चे शिक्षण घेतले.
• त्या 1987 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
• आंतरराष्ट्रीय स्तरावर सुजाता सौनिक यांनी कंबोडिया आणि कोसोवो येथे संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) दोन मानवतावादी मोहिमांमध्ये महिला, बालक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी सुद्धा काम केले आहे.
प्रश्न) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे ?
उत्तर : रश्मी शुक्ला
प्रश्न) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) च्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहे ?
उत्तर : नीना सिंग
✍️CISF बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
ISRO XPosat मिशन । CISF नीना सिंग पहिल्या महिला महासंचालक
https://www.tcs9.in/mr/current-affairs/isro-xposat-misana-cisf-nina-singa-pahilya-mahila-mahasancalaka-84
मैत्री युद्ध सराव
Exercise Maitree
अलिकडेच भारतीय लष्कराची तुकडी मैत्री या संयुक्त लष्करी सरावामध्ये भाग घेण्यासाठी रवाना झाली.
Subject : GS- यद्ध सराव
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारा मैत्री हा भारत आणि ----- देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.
1. थायलंड
2. भूतान
3. श्रीलंका
4. नेपाळ
उत्तर : थायलंड

मैत्री संयुक्त लष्करी सराव :
• मैत्री हा भारत आणि थायलंड या देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.
• यंदाची ही 13 वी आवृत्ती आहे. हा सराव 1 ते 15 जुलै 2024 दरम्यान थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिराप्राकन येथे होणार आहे.
• यापूर्वी 2019 मध्ये मैत्री हा युद्ध अभ्यास मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी झाला होता.
• थायलंडमध्ये होणाऱ्या या युद्धाअभ्यासात भारतीय सैन्य दलातून एकूण 76 सैनिकांचा समावेश असून त्यामध्ये मुख्यत्वे लडाख स्काउट्सच्या तुकडीचे जवान आणि इतर संरक्षण दलांबरोबर सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
सरावाचे उद्दिष्टे :
• भारत आणि थायलंड यांच्यात लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्याचे मैत्री या संयुक्त लष्करी सरावाचे उद्दिष्ट आहे.
• या सरावामध्ये उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती , संयुक्त व्यवस्थापन आणि संयुक्तपणे विविध ड्रिल यांचा समावेश असेल.
• या सरावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत जंगल आणि शहरी भागातील घुसखोरी, दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतेमध्ये वाढ होईल.
• या सरावादरम्यान होणाऱ्या सामाईक कवायतींमध्ये - जॅाईंट ॲापरेशनल सेंटर ची निर्मिती, गुप्तचर आणि देखरेख केंद्राची स्थापना, ड्रोनचा वापर आणि ड्रोन विरोधी यंत्रणा, लँडिंग साठी जागेची निश्चिती, लहान तुकडी रणनीती आणि एक्सट्रॅक्शन ( सुटका), स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स, घेराबंदी आणि शोध मोहीम, रूम इंटरव्हेंशन ड्रिल्स आणि बेकायदेशीर बांधकामे नष्ट करणे यांचा समावेश असेल.
• या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतर-कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल, जसे की संयुक्त कारवाईसाठी रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती इत्यादी.
What is Project Nexus
प्रोजेक्ट नेक्सस काय आहे ?
RBI नुकतीच प्रोजेक्ट नेक्सस मध्ये सामील झाली.
Subject : GS- अर्थशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रोजेक्ट नेक्सस (NEXUS) मध्ये नुकतीच RBI सामील झाली आहे तर हे प्रोजेक्ट नेक्सस खालीलपैकी कोणत्या बँकेद्वारे सुरू करण्यात आले आहे ?
1. जागतिक बँक (WB)
2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना ( IMF)
3. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS)
4. आशियायी डेव्हलपमेंट बँक (ADB)
उत्तर : बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS)

प्रोजेक्ट नेक्सस बद्दल महत्त्वाची माहिती :
• आंतरराष्ट्रीय क्रॅास बॉर्डर रिटेल पेमेंट यामुळे अधिक सक्षम होईल यासाठी देशांतर्गत होणारी फास्ट पेमेंट सिस्टीम लिंक केली जाईल.
• बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटच्या (BIS) इनोवेशन हबने प्रोजेक्ट नेक्सस ची संकल्पना मांडली होती.
• मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि भारत या आशियाई देशांच्या फास्ट पेमेंट सिस्टीम एकमेकांना जोडने हा या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे.
• एकमेकांच्या पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा एकत्रित वापर केल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होतो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पेमेंटची सुलभता आणि खर्च कमी करण्यास यामुळे मदत होईल.
• जेव्हा एखादा नवीन देश नेक्सस प्रोजेक्ट मध्ये सामील होतो तेव्हा आधीचे देश आणि नवीन देश हे आपोआपच एकमेकांना कनेक्ट होतात त्यामुळे सर्व सहभागी देशांचा एकमेकांच्या देशात पेमेंट करण्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होतो.
• प्रोजेक्ट नेक्सस 2026 ला सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) काय आहे ?
• BIS ची स्थापना 1930 मध्ये झाली
• BIS ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.
• ही बँक सदस्य देशांच्या केंद्रीय बँकांच्या मालकीची आहे. (उदाहरणार्थ भारताची केंद्रीय बँक RBI आहे)
• BIS बँक सध्या 63 राष्ट्रीय मध्यवर्ती बँकांच्या मालकीची आहे.
• सदस्य देशांच्या केंद्रीय/मध्यवर्ती बँकांसाठी बँक म्हणून BIS काम करते.
• देशांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारात सहकार्य वाढवणे हे BIS चे प्राथमिक ध्येय आहे.
• मुख्यालय : बासेल, स्वित्झर्लंड येथे आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेल्या प्रोजेक्ट नेक्सस (NEXUS) बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
1. प्रोजेक्ट नेक्सस बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) बँकेद्वारे सुरू करण्यात आले आहे.
2. या प्रोजेक्टमुळे सर्व सहभागी देशांचा एकमेकांच्या देशात पेमेंट करण्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होईल.
3. भारत सुद्धा या प्रोजेक्टचा भाग आहे.
4. वरील पैकी सर्व बरोबर
उत्तर : वरील पैकी सर्व बरोबर
अराकू कॉफी
Araku Coffee
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या रेडिओ कार्यक्रमात अराकू कॉफीच्या अनोख्या चवीचे आणि गुणधर्माचे कौतुक केले.
Subject : GS- GI Tag, कृषी
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या रेडिओ कार्यक्रमात अराकू कॉफीच्या अनोख्या चवीचे आणि गुणधर्माचे कौतुक केले. तर ही अराकू कॉफी कोणत्या राज्यात आढळते ?
1. तामिळनाडू
2. आंध्र प्रदेश
3. कर्नाटक
4. सिक्कीम
उत्तर : आंध्र प्रदेश

अराकू कॉफी बद्दल महत्त्वाची माहिती :
• आंध्र प्रदेशातील अल्लुरी सिताराम राजू जिल्ह्यातील अराकू दरीत अराकू कॉफीची लागवड केली जाते.
• हा भाग भारताच्या पूर्व घाटात (Eastern Ghat) आहे.
• या कॉफीमध्ये चॉकलेट, कॅरमल आणि सूक्ष्म फ्रुटी आम्लाची विशिष्ट चव आहे.
• अराकू कॉफी प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धती वापरून केली जाते.
• ही कॉफी आदिवासी शेतकरी आणि सहकारी तत्त्वावर पिकवली जाते.
• या पद्धतीची शेती आदिवासी लोकांच्या शाश्वत उपजीविका आणि सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देण्यास मदत करते.
• पुरस्कार आणि सन्मान :
• अराकू कॉफीला कॅफे डी कोलंबिया स्पर्धेतील "बेस्ट रोबस्टा" पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
• 2019 मध्ये अराकू कॉफीला अद्वितीय गुण आणि उत्कृष्ट चवीसाठी भौगोलिक संकेतांक (GI Tag) प्राप्त झाला.
कॉफी बद्दल महत्त्वाची माहिती :
• ब्राझील, व्हिएतनाम आणि कोलंबिया हे कॉफीच्या उत्पादनात पहिले तीन उत्पादक देश आहेत.
• भारताचा जगात कॉफीच्या उत्पादनात 6 वा क्रमांक लागतो.
• भारतात कॉफी उत्पादनात पहिले तीन राज्य कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू हे आहेत.