
ISRO XPosat मिशन । CISF नीना सिंग पहिल्या महिला महासंचालक

नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक वृंद तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद..
मला सांगताना आनंद वाटतो की फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षक वृंद आणि बाकीचे वाचक जे कोणत्याही एक्झामसाठी तयारी करत नाही तेपण चालू घडामोडी आवर्जून वाचतात.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.
चला तर पाहुयात तुमची tcs9 टीम तुमच्यासाठी आज काय घेऊन आली आहे ?
• CISF च्या पहिल्या महिला महासंचालक नीना सिंग याबद्दल तसेच CISF म्हणजे नेमकं काय ? ते काय काम करतात ? त्यावर आधारित मागील वर्षाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न.
• इस्रोचे XPosat मिशन आणि त्याबद्दल माहिती. त्याचे काम त्यावर आधारित संभाव्य प्रश्न आणि मागील वर्षाचे काही प्रश्न.
• इतर महत्त्वाच्या बातम्या आणि चालू घडामोडी ,
• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर
नीना सिंग : CISF च्या पहिल्या महिला महासंचालक
• अलीकडेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालक म्हणून नीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
• CISF च्या 54 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे CISF ची कमान सोपविली आहे.
• खरं तर सर्वांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. प्रथम IPS किरण बेदींपासून सुरुवात झालेली ही परंपरा CISF च्या उच्च पदापर्यंत आज येऊन पोहोचली आहे. हीच खरी सावित्रीमाईंना आदरांजली असेल.
चला तर जाणून घेऊया परीक्षेच्या दृष्टिकोनातून नीना सिंग यांबद्दल, CISF म्हणजे काय ? त्याचे कार्य कोणते ? CISF बद्दल मागील वर्षाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न टॅापीकच्या शेवटी बघू.
नीना सिंग
• नीना सिंग यांचा जन्म बिहारची राजधानी पाटणा येथे 11 जुलै 1964 रोजी झाला.
• राजस्थान कॅडरच्या त्या 1989 पॅचच्या IPS अधिकारी आहेत.
• त्यांनी MA पर्यंत शिक्षण घेतले आहे. तसेच त्या राजस्थान येथील पोस्टिंग दरम्यान हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्मेंट मध्ये परदेशात अभ्यासासाठी गेल्या होत्या.
(गव्हर्मेंट पोस्टिंग दरम्यान उच्च शिक्षणासाठी सनदी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देतात.
सनदी अधिकाऱ्यांनी या शिक्षणाचा फायदा देश सेवेसाठी करावा असे अभिप्रेत असते.)
CISF ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा,1968 अंतर्गत 10 मार्च 1969 रोजी CISF ची स्थापना करण्यात आली.
CISF अंतर्गत ७४ अन्य संघटन, 12 रिझर्व बटालियन आणि 8 प्रशिक्षण संस्था आहे.
CISF च काम काय असतं ?
• विमानतळ, दिल्ली मेट्रो, अंतराळ विभाग, अणुऊर्जा प्रकल्प, बंदरे, ऐतिहासिक वास्तू, वीज, कोळसा, हॉस्पिटल आणि खाणकाम क्षेत्र तसेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा क्षेत्रांना सुरक्षा पुरविणे.
• CISF देशाच्या राजधानीतील महत्त्वाच्या सरकारी इमारती त्याचबरोबर खाजगी विभागातील क्षेत्रांनाही सुरक्षा पुरवितात.
• CISF विशेष व्यक्तींना देण्यात येणारी झेड प्लस, झेड, एक्स, वाय ( Z Plus, Z, X, Y) श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था प्रदान करते.
• CISF हे एकमेव असे दल आहे की ज्याकडे स्वतःचे समर्पित अग्निशमन शाखा (फायर विंग ) आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी वनलाइनर प्रश्न पुढील प्रमाणे
प्रश्न) दरवर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना दिन केव्हा साजरी केला जातो ?
(SSC GD)
1) 12 जुलै
2) 10 जून
3) 10 मार्च
4) 12 एप्रिल
उत्तर) 3) 10 मार्च
प्रश्न) अलीकडेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर) नीना सिंग
प्रश्न) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाविषयी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
1) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना 10 मार्च 1969 रोजी झाली.
2) किरण बेदी या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक होत्या.
3) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
4) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा क्षेत्रांना सुरक्षा पुरवितात.
उत्तर) 2) किरण बेदीं या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक होत्या. हे विधान चुकीचे आहे CISF च्या पहिल्या महिला महासंचालक नीना सिंग या आहेत.
एक्सपोसॅट मिशन
XPoSat MISSION
अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो -ISRO) ने एक्सपोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या आधी ISRO ने कोणते उपग्रह पाठवले ? उपग्रह पाठवणाऱ्यात लॉन्च वेहिकलचे नाव काय ?
ते उपग्रह कोणत्या स्थानावरून पाठवले ? असे प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण टॉपिकच्या शेवटी पाहू.
सिल्याबस च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकच्या अंतर्गत आपण इस्रोचे एक्सपोसॅट मिशन काय आहे हे शिकणार आहोत.
काय आहे एक्सपोसॅट मिशन ?
अंतराळातील ब्लॅक होल, एक्स-रे बायनरी, ॲक्टिव्ह गॅलेकटिक न्यूक्लिया, कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, पल्सर विंड नेबुला इत्यादींसारख्या विविध खगोलीय स्त्रोतांमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचा अभ्यास हा उपग्रह करणार आहे.
उपग्रह कोठून सोडण्यात आला ? आणि उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला ?
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर वरून PSLV-C58 या रॉकेटचा वापर करून एक्सपोसॅट अंतराळात सोडण्यात आला.
एक्सपोसॅट मिशन म्हणजे भारतासाठी गौरवाची बाब :
• खगोलस्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी वेधशाळा पाठवणारा भारत हा दुसरा देश बनला.
• याआधी 2021 मध्ये अमेरिकेच्या नासाने (NASA)असा उपग्रह पाठवला आहे.
PSLV आणि GSLV नेमकं काय आहे ?
ISRO ने उपग्रहांना लॉन्च करण्यासाठी दोन रॉकेट प्रक्षेपण प्रणाली तयार केल्या आहेत.
त्यापैकी PSLV ( Polar Satellite Launch Vehicle) हे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन तर GSLV जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन आहे.
PSLV आणि GSLV मध्ये फरक काय ?
• PSLV मुख्यतः पृथ्वी निरीक्षण उपग्रहांना 600 ते 900 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करण्यासाठी वापरतात.
• तर GSLV दळणवळण उपग्रहांना प्रक्षेपित करतात. GSLV अंदाजे 36000 किलोमीटर उंचीच्या वर उपग्रह उचलण्यात सक्षम असतात.
• GSLV ची पेलोड क्षमता PSLV च्या तुलनेत जास्त आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी वनलाइनर प्रश्न
प्रश्न) खगोलस्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी वेधशाळा पाठवणारा भारत हा कितवा देश बनला ?
उत्तर : दुसरा
प्रश्न) एक्सपोसॅट उपग्रह पाठवणाऱ्यात लॉन्च वेहिकलचे नाव काय ?
उत्तर: PSLV-C58
प्रश्न) इस्रो ने एक्सपोसॅट नावाचा उपग्रह कोठून प्रक्षेपित केला ?
उत्तर : श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर वरून
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर
‣ रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या.
‣ ओडिशा राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला जीआय टॅग ( GI Tag) प्राप्त झाला.
जीआय टॅग काय असतो? त्याचा फायदा काय हे आपण आधी बघितलेल आहे. त्याची लिंक खाली प्रोव्हाइड केलेली आहे.
लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता.
माहूर GI टॅग | जागतिक पर्यावरण दिन | आदि कैलास 180 यात्रेकरूं | अग्नी -1 मिसाइल