
चालू घडामोडी 02, जुलै 2024

संज्ञान App
अलीकडेच, रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालकांनी (RPF - Railway Protection Force) संज्ञान ॲप (Sangyaan App) नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले.
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) नुकतेच लॉन्च केलेले संज्ञान ॲप कशाच्या संदर्भात आहे ?
1. कायद्यांची माहिती
2. हवामान माहिती
3. सरकारी टेंडर माहिती
4. कृषी माहिती
उत्तर : कायद्यांची माहिती

काय आहे संज्ञान App ?
• भारतातील कायदेशीर घडामोडींची माहिती या ॲपमध्ये दिलेली आहे.
• हे App रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) टेक्निकल टीमने डिझाईन आणि विकसित केले आहे.
उद्दिष्टे :
• RPF कर्मचाऱ्यांना नवीन आणि जुन्या दोन्ही कायद्यांच्या तरतुदीत समजून घेण्यासाठी माहिती प्रदान करणे तसेच RPF कर्मचाऱ्यांना शिक्षित आणि सशक्त करणे हे या ॲपचे उद्दिष्टे आहेत.
• हे ॲप नवीन आलेले तीन गुन्हेगारी कायदे -1) भारतीय न्याय संहिता, 2023 (2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 (3) भारतीय साक्ष अधिनियम, 2023 या कायद्यांबद्दल सखोल माहिती देते.
रेल्वे संरक्षण दल (RPF) बद्दल महत्त्वाची माहिती :
• स्वातंत्र्यापूर्वी 1882 मध्ये वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या स्वतःच्या मालाचे संरक्षण करण्यासाठी स्वतः चे सैन्य नेमत असत.
• भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1957 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे या सैन्याला वैधानिक दल (Statutory Force) म्हणून घोषित करण्यात आले.
• पुढे 1985 मध्ये या दलाला भारतीय संघराज्याचे सशस्त्र दल म्हणून घोषित करण्यात आले.
• आता हे दल केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या परिचालन आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली सशस्त्र दल म्हणून काम करते.
• रेल्वेच्या मालमत्तेचे, प्रवाशांचे संरक्षण आणि सुरक्षा करणे हे RPF चे काम आहे.
RIMPAC सागरी युद्ध सराव
बातम्यांमध्ये : दक्षिण चीन समुद्र आणि उत्तर प्रशांत महासागरात तैनात असलेली भारतीय युद्ध नौका शिवालिक जगातील सर्वात मोठा नौदल सराव (Naval Exercise) असलेल्या रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC) मध्ये सहभागी होण्यासाठी हवाई येथील पर्ल हार्बरवर पोहोचली आहे.
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) बातम्यांमध्ये असलेल्या रिम ऑफ द पॅसिफिक सागरी सराव (RIMPAC) 2024 चे आयोजन कुठे केले जात आहे ?
1. अरबी समुद्र
2. अंदमान निकोबार बेट भारत
3. हवाई बेटे अमेरिका
4. हिरोशिमा जपान
उत्तर : हवाई बेटे अमेरिका

रिम ऑफ द पॅसिफिक सागरी सराव (RIMPAC) :
• हवाई येथे होणारा हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव (Maritime Exercise) आहे.
• हवाई हे संयुक्त अमेरिकेचे पॅसिफिक महासागरातील एक राज्य (बेट) आहे.
• हा एक बहुराष्ट्रीय नौदल सराव असून सुमारे 29 देश या सरावामध्ये भाग घेणार आहेत.
• अमेरिका नौदलाच्या नेतृत्वाखाली होणार हा सराव 1 ऑगस्टपर्यंत चालेल.
• इंटिग्रेटेड अँड रेडी या थीम अंतर्गत हा सराव आयोजित केला गेला आहे.
• उद्दिष्ट : सरावा मध्ये सहभागी देशांमध्ये आंतरकार्यक्षमता वाढवणे आणि सहभागी देशांच्या नौदलांमध्ये मैत्रीपूर्ण विश्वास निर्माण करणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहेत.
12 विश्व हिंदी सन्मान
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 12 विश्व हिंदी सन्मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?
1. संजना ठाकूर
2. डॉ. उषा ठाकूर
3. श्रीराम शर्मा
4. अरुंधती रॉय
उत्तर : डॉ. उषा ठाकूर

12 विश्व हिंदी सन्मान
• नुकताच नेपाळमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या हिंदी संवाद कार्यक्रमात डॉ. उषा ठाकूर यांना 12 वा विश्व हिंदू सन्मान देऊन गौरविण्यात आले.
• हिंदी साहित्याच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
• हा पुरस्कार भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून दिला जातो.
• 2023 मध्ये फिजी येथे 12 वी जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत डॉ. उषा ठाकूर उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना हा पुरस्कार काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला.
जागतिक हिंदी परिषद :
• जागतिक हिंदी परिषद हिंदी भाषेतील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद आहे.
• उद्दिष्टे : हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, हिंदी भाषेच्या विकासाचे वेळोवेळी मूल्यांकन करणे, हिंदी भाषेतील साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे, जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हे जागतिक हिंदी परिषदेचे उद्दिष्टे आहेत.
पहिली जागतिक हिंदी परिषद केव्हा आणि कुठे झाली ?
पहिली जागतिक हिंदी परिषद 10 ते 14 जानेवारी 1975 रोजी नागपूर येथे झाली.
भारताचे नवे परराष्ट्र सचिव
Subject : GS - नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचे नवे परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. हर्षवर्धन श्रींगला
2. विक्रम मिसरी
3. विनय मोहन क्वात्रा
4. सुब्रमण्यम जयशंकर
उत्तर : विक्रम मिसरी

• नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारताचे नवे परराष्ट्रीय सचिव म्हणून विक्रम मिसरी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
• विक्रम मिसरी हे 15 जुलै 2024 रोजी पासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
• विक्रम मिसरी हे भारताचे 35 वे परराष्ट्र सचिव असतील.
विक्रम मिसरी यांच्या बद्दल थोडक्यात माहिती :
• यांचा जन्म 1964 मध्ये श्रीनगर येथे झाला.
• ते 1989 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्रीय सेवा (Indian Foreign Service) अधिकारी आहेत.
• त्यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात विविध पदांवर काम केले आहे.
प्रश्न) भारताचे पहिले परराष्ट्र सचिव कोण होते ?
उत्तर : के. पी. एस. मेनन सर