
चालू घडामोडी | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : जीवनकार्य, साहित्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ
Lokshahir Annabhau Sathe
📚 Subject : GS - महाराष्ट्राचा इतिहास - समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठी साहित्य
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) फकिरा ही कादंबरी कोणी लिहिली ?
(महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी : 2023)
1. शिवाजी सावंत
2. पु. ल. देशपांडे
3. अण्णाभाऊ साठे
4. साने गुरूजी
उत्तर : अण्णाभाऊ साठे
📰 पार्श्वभूमी :
• तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' हे महाराष्ट्रातील महान समाजसुधारक, लोकशाहीर, कादंबरीकार, नाटककार आणि मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारवंत होते.
• औपचारिक शिक्षण केवळ दीड दिवसांचे असूनही त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्यात वास्तववादी, वंचित, कष्टकरी व मातंग समाजाच्या व्यथा मांडून जागतिक स्तरावर (विशेषतः रशियात) मराठी भाषेचा डंका वाजवला.
🧐 जीवन परिचय आणि मूलभूत माहिती :
• पूर्ण नाव : तुकाराम भाऊराव साठे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे).
• जन्म : 1 ऑगस्ट 1920.
• जन्मस्थान : वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
• स्मृतीदिन (निधन) : 18 जुलै 1969 (मुंबई).
✍️ बालपण आणि मुंबई प्रवास :
• लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शालेय शिक्षण झालेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.
• 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. मुंबईत त्यांनी चरितार्थ चालवण्यासाठी मिळेल ती कामे केली.
• मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले.
• मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली.
🚩 सामाजिक व राजकीय चळवळींमधील योगदान (Social & Political Movement)
🏛️ लाल बावटा कलापथक (1944) :
• डाव्या विचारसरणीने प्रभावित होऊन त्यांनी शाहीर अमर शेख आणि शाहीर डी. एन. गव्हाणकर यांच्यासमवेत 'लाल बावटा कलापथका'ची (Lal Bawta Kalapathak) स्थापना केली.
• या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी शोषितांच्या, शेतमजुरांच्या आणि गिरणी कामगारांच्या हक्कांवर जनजागृती केली.

🏛️ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अद्वितीय भूमिका :
• लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले होते.
• "महाराष्ट्राची परंपरा" (1950) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला.
• "मुंबई कुणाची ?" ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले.
• संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा गीत "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली" ही लावणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे.

🤝 दलित साहित्य संमेलन (1958) :
• 1958 मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या 'दलित साहित्य संमेलना'चे उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांनी केले.
• या संमेलनातील त्यांचे ऐतिहासिक वाक्य मराठी साहित्याची दिशा ठरवणारे ठरले -
• "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलित व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे."
📚 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विपुल साहित्य संपदा (Literary Legacy)
📖 कादंबऱ्या (तब्बल 35 हून अधिक कादंबऱ्या) :
• फकिरा (Fakira - 1959) : ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी असून 1961 मध्ये या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला.
• ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केली होती.
📜 गाजलेले पोवाडे : स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, मुंबईचा कामगार, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, तेलंगणाचा संग्राम.
✈️ प्रवासवर्णन : 'माझा रशियाचा प्रवास' (1961)
• रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते 1961 साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित "माझा रशियाचाप्रवास" हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.
(✍️ नोट : 2022 मध्ये मॉस्को येथील लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.)

📜 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यांपैकी काही साहित्य :

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
• जन्म → 1 ऑगस्ट 1920 (वाटेगाव, सांगली)
• स्मृतीदिन → 18 जुलै 1969
• कलापथक स्थापना → लाल बावटा कलापथक
• सर्वोत्कृष्ट कादंबरी → 'फकिरा' (1961 चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार)
• संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा गीत → माझी मैना गावाकडं राहिली
• ऐतिहासिक विचार → "पृथ्वी ही शेषाच्या नव्हे, तर श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे" (1958 दलित साहित्य संमेलन)
• प्रवासवर्णन → माझा रशियाचा प्रवास
















