
चालू घडामोडी | जागतिक पर्यावरण दिन 2026
World Environment Day 2026
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) अंतर्गत पार पडलेल्या 'जागतिक पर्यावरण दिन 2026' चे अधिकृत यजमानपद कोणत्या देशाने भूषवले आहे ?
- भारत
- केनिया
- अझरबैजान
- स्वीडन
उत्तर : अझरबैजान (Azerbaijan)
📰 बातमी काय ?
• जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी दरवर्षी 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
🧐 वर्ष 2026 च्या जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचे यजमान देश कोण ?
• संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (UNEP) जाहीर केल्यानुसार, वर्ष 2026 च्या जागतिक पर्यावरण दिन मुख्य सोहळ्याचे यजमानपद अझरबैजान प्रजासत्ताक (Republic of Azerbaijan) या देशाकडे सोपवण्यात आले आहे.
याचे मुख्य आयोजन अझरबैजानची राजधानी बाकू (Baku) येथे करण्यात आले.
🧐 जागतिक पर्यावरण दिन 2026 ची संकल्पना (The Theme - 2026)
• या वर्षाची अधिकृत मुख्य संकल्पना "निसर्गापासून प्रेरित. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी" (Inspired by Nature. For Climate. For Our Future) ही आहे.

✍️ या संकल्पनेचे 3 मुख्य आधारस्तंभ खालीलप्रमाणे आहेत :
1) निसर्गापासून प्रेरित (Inspired by Nature) → यामध्ये प्रामुख्याने 'निसर्गावर आधारित उपायांना' (Nature-based Solutions - NbS) प्रोत्साहन दिले जाते.
जसे की मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण (Afforestation), विस्कळीत परिसंस्थांचे पुनरुज्जीवन (Ecosystem restoration) आणि पाणथळ जागांचे (Wetlands) जतन करणे.
2) हवामानासाठी (For Climate) → हवामान बदलाचे संकट रोखण्यासाठी कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे (Carbon sequestration) आणि पर्यावरणाची लवचिकता वाढवण्यावर यात भर दिला जातो.
3) आपल्या भविष्यासाठी (For Our Future) → नैसर्गिक संसाधनांचे अतिशोष थांबवून आगामी पिढ्यांसाठी त्यांचे रक्षण करण्याच्या गरजेवर यामध्ये प्रामुख्याने प्रकाश टाकला गेला आहे.
📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आयोजक संस्था (Historical Background & UNEP)
• स्थापना - जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) 1972 मध्ये केली होती.
मानवी पर्यावरणावर भर देणाऱ्या ऐतिहासिक 'स्टॉकहोम परिषद, 1972' (Stockholm Conference on the Human Environment) च्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ (5 जून 1972) हा दिवस निश्चित करण्यात आला.
🤔 पहिला जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरी केला गेला ?
• पहिला जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1973 रोजी साजरा केला गेला.
🧐 पहिल्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना (थीम) काय होती ?
• 5 जून 1973 मध्ये साजरी केलेल्या पहिल्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना (थीम) Only one Earth (फक्त एकच पृथ्वी) ही होती.
🏛️ समन्वयक संस्था (Organizing Body):
• UNEP उपक्रम - या जागतिक मोहिमेचे संपूर्ण नियोजन आणि समन्वय संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme - UNEP) या संस्थेद्वारे केले जाते.
• मुख्यालय (Headquarter) - UNEP चे मुख्यालय केनिया देशातील नैरोबी (Nairobi, Kenya) या ठिकाणी आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : जागतिक पर्यावरण दिन 2026
• जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची तारीख → 5 जून (दरवर्षी)
• 2026 मधील यजमान देश → अझरबैजान ( राजधानी - बाकू)
• 2026 ची अधिकृत थीम → Inspired by Nature. For Climate. For Our Future.
• पर्यावरण दिनाची स्थापना झालेले वर्ष → 1972 (स्टॉकहोम परिषद)
• पहिला पर्यावरण दिन साजरा झालेले वर्ष व थीम → 1973 ("Only One Earth")





















