
चालू घडामोडी | विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) कायदा, 2025
VB-G RAM G Act, 2025
📚 Subject : GS - सरकारी योजना - ग्रामीण योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1 जुलै 2026 पासून लागू झालेल्या 'VB-G RAM G कायद्यानुसार' ग्रामीण भागातील कुटुंबांना दरवर्षी किमान किती दिवसांच्या अकुशल रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते ?
1. 90 दिवस
2. 100 दिवस
3. 125 दिवस
4. 150 दिवस
उत्तर : 125 दिवस
📰 बातमी काय ?
• संसदेने डिसेंबर 2025 मध्ये संमत केलेला 'VB-G RAM G कायदा, 2025' अखेर 1 जुलै 2026 पासून संपूर्ण देशात लागू झाला आहे.
• या नवीन कायद्याने गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या 'मनरेगा' (MGNREGA, 2005) कायद्याची जागा घेतली आहे.
• मुख्य उद्देश - 'विकसित भारत @2047' चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील रोजगाराचे स्वरूप अधिक आधुनिक आणि भक्कम करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
📜 ग्रामीण रोजगाराचा इतिहास (थोडक्यात पार्श्वभूमी) :
1) पहिले टप्पे (1960s - 1970s) -
• रुरल मॅनपावर प्रोग्राम (1960s) आणि क्रॅश स्कीम फॉर रुरल एम्प्लॉयमेंट (1971) यांसारख्या योजनांनी सुरुवातीला ग्रामीण भागातील गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला.
2) योजनांचे एकत्रीकरण (1980s - 1990s) -
• पुढे जाऊन जवाहर रोजगार योजना (1993) आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (1999) यांसारख्या अधिक सुटसुटीत योजना आणल्या गेल्या.
3) महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 (Maharashtra Employment Guarantee Act , 1977) -
• महाराष्ट्र रोजगार हमी कायद्याने 'कामाचा कायदेशीर हक्क' संकल्पना आणली.
• याचबरोबर गरिबांना 'कामाचा कायदेशीर हक्क' देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
4) मनरेगा (MGNREGA, 2005) -
• महाराष्ट्राच्या याच मॉडेलवरून पुढे देशात 'मनरेगा' कायदा बनला, ज्याने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला 100 दिवस कामाची कायदेशीर हमी दिली.

🧐 नवीन VB-G RAM G कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती ?
1) रोजगाराच्या दिवसांत वाढ (125 दिवस) -
• नवीन कायद्यानुसार आता वर्षाला 100 दिवसांऐवजी किमान 125 दिवस कामाची हमी मिळेल.
2) शेतीच्या मुख्य हंगामात 60 दिवसांचा ब्रेक -
• पेरणी आणि कापणीच्या ऐन हंगामात शेतात मजूर उपलब्ध व्हावेत आणि शेतीचे नुकसान होऊ नये, म्हणून या योजनेत वर्षातून 60 दिवस कामाला ब्रेक (Pause) दिला जाईल.
3) खर्चातील राज्यांचा /केंद्रशासित प्रदेशांचा वाटा :
• केंद्र: 60% आणि राज्य: 40% - मनरेगामध्ये मजुरीचा 100% खर्च केंद्र सरकार करायचे. पण नवीन कायद्यात सामान्य राज्यांना 40% खर्च स्वतः करावा लागेल.
• अपवाद - (केंद्र: 90%) - ईशान्येकडील/हिमालयीन राज्ये व विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकार 90% खर्च करेल.
• अपवाद - केंद्र 100 % - तर विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकार 100% खर्च करेल.
4) रोजंदारीचा नवा दर (किमान ₹300/दिवस) -
• केंद्राने मजुरांसाठी देशात कुठेही किमान ₹ 300 प्रतिदिवस (Floor Wage) हा तळाचा दर निश्चित केला आहे.
• वेगवेगळ्या राज्यांनुसार रोजंदारी ₹300 ते ₹409 दरम्यान (सिक्कीमच्या काही भागात ₹450 पर्यंत) असेल.
5) नवीन 'ग्रामीण रोजगार हमी कार्ड' -
• जुन्या 'जॉब कार्ड' ऐवजी आता 3 वर्षांची मुदत असणारे नवीन स्मार्ट कार्ड मिळेल.
• महिला, वृद्ध, दिव्यांग, PVTGs आणि ट्रान्सजेंडर घटकांना ओळखीसाठी विशेष रंगांची कार्ड्स दिली जातील.
6) मजुरीचे वाटप आणि बेरोजगारी भत्ता -
• काम पूर्ण झाल्यावर मजुरीचे पैसे 15 दिवसांच्या आत मजुराच्या खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. उशीर झाल्यास 0.05% प्रतिदिवस भरपाई मिळेल.
• अर्ज करूनही 15 दिवसांत काम न मिळाल्यास पहिल्या 30 दिवसांसाठी रोजंदारीच्या 1/4 (एक-चतुर्थांश) आणि त्यानंतर 1/2 (अर्धा) बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : VB-G RAM G Act, 2025
• पूर्ण नाव → विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) कायदा, 2025
• कायदा लागू झाल्याची तारीख → 1 जुलै 2026
• वार्षिक रोजगाराचे दिवस → 125 दिवस
• शेती हंगामातील ब्रेक → 60 दिवस
• खर्चाचे प्रमाण (सामान्य राज्ये) → 60% केंद्र : 40% राज्य
• ईशान्येकडील/हिमालयीन राज्ये व विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेश → 90% केंद्र : 10% राज्य
• विधानसभा नसलेले केंद्रशासित प्रदेश → 100% केंद्र
• किमान रोजंदारी (Floor Wage) → ₹300 प्रतिदिवस























