
चालू घडामोडी | शिमला कराराला 54 वर्षे पूर्ण
54 Years of Simla Agreement - 1972
📚 Subject : GS - स्वातंत्र्यानंतरचा इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2 जुलै 1972 रोजी झालेल्या ऐतिहासिक 'शिमला करारावर' (Simla Agreement) भारताच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली होती ?
1. जवाहरलाल नेहरू
2. लाल बहादूर शास्त्री
3. इंदिरा गांधी
4. अटलबिहारी वाजपेयी
उत्तर : इंदिरा गांधी
📰 बातमी काय ?
• 2 जुलै 2026 रोजी ऐतिहासिक 'शिमला कराराला' (Simla Agreement) 54 वर्षे पूर्ण झाली आहेत.
• 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यासाठी हा करार करण्यात आला होता.
🧐शिमला कराराची पार्श्वभूमी आणि स्वाक्षरीकर्ता
1) पार्श्वभूमी (Background):
• 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला, ज्याच्या परिणामी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन 'बांगलादेश' (Bangladesh) या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली.
2) स्वाक्षरीकर्ता (Signatories):
• 2 जुलै 1972 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे या करारावर स्वाक्षरी झाली.
• भारत - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi)
• पाकिस्तान - तत्कालीन राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो (Zulfikar Ali Bhutto)

📜 शिमला करारातील प्रमुख तरतुदी (Key Provisions)
1) द्विपक्षीय चर्चा (Bilateral Negotiations) -
• भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सर्व प्रलंबित मुद्दे आणि वाद कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय (Third-party involvement) केवळ द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवले जातील.
2) नियंत्रण रेषा (Line of Control - LoC) -
• जम्मू आणि काश्मीरमधील तात्पुरती युद्धबंदी रेषा (Ceasefire Line) 'नियंत्रण रेषा' (LoC) म्हणून पुनर्व्याख्यायित करण्यात आली.
• दोन्ही देश ही रेषा एकतर्फी (Unilaterally) बदलणार नाहीत यावर सहमत झाले.
3) युद्धकैद्यांची सुटका (Prisoners of War) -
• भारताने आपल्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानच्या सुमारे 93,000 युद्धकैद्यांची सुटका करण्याचे मान्य केले.
4) बांगलादेशला मान्यता -
• पाकिस्तानने बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला (Sovereignty) अधिकृत मान्यता देण्याचे आणि संबंध सामान्य करण्याचे वचन दिले.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Simla Agreement
• शिमला कराराची तारीख → 2 जुलै 1972
• स्थान → शिमला (हिमाचल प्रदेश)
• स्वाक्षरीकर्ते → इंदिरा गांधी (भारत) आणि झुल्फिकार अली भुट्टो (पाकिस्तान)
• मुख्य वैशिष्ट्य → भारत-पाक वादात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप अमान्य (द्विपक्षीय तत्व)
• LoC ची निर्मिती → युद्धबंदी रेषेचे 'नियंत्रण रेषा' (LoC) असे नामकरण
























