
चालू घडामोडी | महाराष्ट्र कृषी दिन
Maharashtra Agriculture Day
📚 Subject : GS - दिनविशेष, महाराष्ट्राचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो ?
1 - यशवंतराव चव्हाण
2 - विलासराव देशमुख
3 - वसंतराव नाईक
4 - शंकरराव चव्हाण
उत्तर : वसंतराव नाईक
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो.
• या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
🤔1 जुलै हाच दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून का साजरी करतात ?
• महाराष्ट्र राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ 1 जुलै हा त्यांचा जन्म दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

✍️ श्री वसंतराव फुलसिंग नाईक यांबद्दल थोडक्यात माहिती :
• जन्म : 1 जुलै 1913
• जन्मस्थळ : गहुली (यवतमाळ जिल्हा)
🤝 श्री वसंतराव नाईक यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य :
• श्री वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते.
• 1963 ते 1975 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
• यांना महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
• त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले.
• त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले.
• त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले.
• त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.
• त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांनी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
✍️ नोट :
• जागतिक हरित क्रांती चे जनक : नॉर्मन बोरलॉग
• भारतीय हरितक्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन
• महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक : वसंतराव नाईक

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : महाराष्ट्र कृषी दिन
• महाराष्ट्र कृषी दिन → 1 जुलै
• स्मरणार्थ → श्री. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस
• श्री. वसंतराव नाईक जन्म → 1 जुलै 1913
• जन्मस्थळ → गहुली (यवतमाळ जिल्हा)
• मुख्यमंत्रिपदाचा काळ → 1963 ते 1975 (महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री)
• विशेष ओळख → महाराष्ट्रातील 'हरितक्रांतीचे जनक'
• कृषी दिन सुरू करण्याचा निर्णय → 1989 मध्ये (तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांच्या कार्यकाळात)





















