
चालू घडामोडी | पुणे हत्या प्रकरणात फॉरेन्सिक गेट ॲनालिसिस चा वापर
Use of Forensic Gait Analysis in the Pune murder case
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, कायदे
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच गुन्हे तपासात आणि CCTV फुटेज विश्लेषणात वापरण्यात येणारे 'गेट ॲनालिसिस' (Gait Analysis) हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1. मानवी आवाजाचे तरंग आणि फ्रीक्वन्सी विश्लेषण
2. मानवी चालण्याच्या आणि धावण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास
3. रक्ताचे नमुने आणि डीएनए (DNA) फिंगरप्रिंटिंग
4. हस्तक्षर आणि कागदपत्रांची बनावटगिरी ओळखणे
उत्तर : मानवी चालण्याच्या आणि धावण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास
📰 बातमी काय ?
• पुण्यातील एका नुकत्याच घडलेल्या हत्या प्रकरणाच्या तपासात, पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी संशयित आरोपीची ओळख पटवण्यासाठी 'फॉरेन्सिक गेट ॲनालिसिस' (Forensic Gait Analysis) आणि AI-आधारित CCTV फुटेज विश्लेषणाचा वापर केला आहे.
• CCTV फुटेज अस्पष्ट असले तरी व्यक्तीच्या चालण्याच्या किंवा धावण्याच्या विशिष्ट पद्धतीवरून (Gait) त्याची अचूक ओळख पटवणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.
🧐 गेट ॲनालिसिस (Gait Analysis) म्हणजे काय ?
A) संकल्पना:
• गेट ॲनालिसिस म्हणजे मानवी चालण्याच्या किंवा धावण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास (Scientific Study) होय.
• चालणे किंवा धावणे ही स्नायू (Muscles), हाडे (Bones) आणि मज्जासंस्था (Nervous System) यांच्यातील गुंतागुंतीच्या समन्वयाने होणारी क्रिया आहे.
• या सर्व घटकांच्या समन्वयाचे पृथक्करण करून व्यक्तीची विशिष्ट चालण्याची शैली स्पष्ट केली जाते.
B) गेट चक्र (Gait Cycle):
• एका पायाचा जमिनीला स्पर्श झाल्यापासून ते पुन्हा त्याच पायाचा जमिनीला स्पर्श होईपर्यंतच्या सर्व हालचालींच्या क्रमाला 'गेट चक्र' (Gait Cycle) म्हणतात.
• याचे दोन मुख्य टप्पे असतात -
1) स्टॅन्स फेज (Stance Phase) - जेव्हा पाय जमिनीच्या संपर्कात असतो आणि शरीराचे संपूर्ण वजन पेलतो.
2) स्विंग फेज (Swing Phase) - जेव्हा पाय हवेत असतो आणि पुढील पाऊल टाकण्यासाठी पुढे सरकत असतो.

🩺 गेट ॲनालिसिसचे विविध क्षेत्रांतील उपयोग (Applications) :
1) फॉरेन्सिक तपास (Forensic Crime Investigation) - सीसीटीव्ही फुटेजमधील एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या शैलीची तुलना संशयित आरोपीच्या प्रत्यक्ष चालण्याच्या शैलीशी करून गुन्हेगाराची ओळख पटवली जाते.
2) वैद्यकीय उपचार (Clinical Study) - पार्किन्सन्स (Parkinson's Disease), सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) आणि स्ट्रोकनंतरच्या (Post-Stroke) रुग्णांमधील हालचालींमधील व्यंग किंवा त्रुटी ओळखण्यासाठी डॉक्टर याचा वापर करतात.
3) क्रीडा क्षेत्र (Sports Science) - धावपटू आणि खेळाडू आपल्या धावण्याचा वेग वाढवण्यासाठी आणि दुखापती टाळण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Forensic Gait Analysis
• Gait Analysis म्हणजे काय → मानवाच्या चालण्याच्या आणि धावण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास
• मुख्य तांत्रिक घटक → स्नायू, हाडे आणि मज्जासंस्था यांचा समन्वय
• गैट चक्राचे २ टप्पे → स्टॅन्स फेज (पाय जमिनीवर) व स्विंग फेज (पाय हवेत)
• फॉरेन्सिकमधील वापर → CCTV फुटेजमधील चालण्याच्या शैलीवरून गुन्हेगाराची ओळख पटवणे
• वैद्यकीय वापर → पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी व स्ट्रोक रुग्णांच्या उपचारासाठी
























