
चालू घडामोडी | 'माचा टी' - व्यावसायिक उत्पादन करणारे देशातील पहिले राज्य
The First State in the Country to Commercially Produce 'Matcha Tea'
📚 Subject : GS - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) तिनसुकिया जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध 'माचा टी' (Matcha Tea) चे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले आहे. यानुसार मॅचा चहाचे व्यावसायिक उत्पादन करणारे खालीलपैकी कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?
1 - आसाम
2 - पश्चिम बंगाल
3 - सिक्किम
4 - केरळ
उत्तर : आसाम
📰 बातमी काय ?
• पूर्व आसाममधील तिनसुकिया (Tinsukia) जिल्ह्यातील 'छोटा टिंगराई चहा इस्टेट'मध्ये (Chota Tingrai Tea Estate) 'मॅचा टी'चे (Matcha Tea) उत्पादन सुरू झाले असून, आसाम हे भारतातील माचा टी चे व्यावसायिक उत्पादन करणारे पहिले राज्य ठरले आहे.
• आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या प्रीमियम चहाच्या निर्मितीकडे भारतातील चहा उद्योगाचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
🧐 'माचा टी' म्हणजे काय ?
What is Matcha Tea ?
1) विशिष्ट शेती पद्धत (Shading Technique):
• माचा चहा हा नेहमीच्या 'कॅमेलिया सायनेन्सिस' (Camellia sinensis) या चहाच्या वनस्पतीपासूनच तयार केला जातो.
• मात्र, काढणीच्या (Harvest) 3 ते 4 आठवडे आधी या चहाच्या झाडांना जाळी लावून 90% सूर्यप्रकाश रोखला जातो (Shading).
2) जैविक बदल आणि चव -
• सूर्यप्रकाश रोखल्यामुळे पानांमधील 'क्लोरोफिल' (Chlorophyll) आणि 'अमिनो ॲसिड' (Amino Acids) चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते.
• यामुळे या चहाला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण तेजस्वी हिरवा रंग आणि समृद्ध 'उमामी' (Umami) चव प्राप्त होते.

📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि जागतिक व्यापार :
1) उगम आणि इतिहास -
• पूर्व-आधुनिक काळात चीन आणि जपानमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीतून माचा चहाचा उगम झाला.
• चीनमधील पावडर चहाच्या पद्धती जपानी झेन बौद्ध भिक्षूंनी (Zen Buddhist Monks) जपानमध्ये नेल्या आणि तिथे या चहाचा विकास झाला.
• माचा चहा (Matcha Tea) चा उगम चीनमध्ये झाला, परंतु त्याचे आधुनिक रूप आणि चहाची संस्कृती जपानमध्ये विकसित आणि जतन झाली.
2) प्रमुख उत्पादक देश - सध्या चीन हा जगात 'माचा टी'चा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
3) प्रमुख निर्यात बाजारपेठा - अमेरिका (USA), कॅनडा, युके (UK), जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि मध्य पूर्वेतील (Middle East) देश हे मॅचा चहाचे मुख्य आयातदार आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Matcha Tea Production
• व्यावसायिक उत्पादन करणारे पहिले राज्य → आसाम
• चहाची वनस्पती → कॅमेलिया सायनेन्सिस (Camellia sinensis)
• विशेष प्रक्रिया → काढणीपूर्वी 3 ते 4 आठवडे 90% सूर्यप्रकाश रोखणे
• रंग व चव → क्लोरोफिलमुळे तेजस्वी हिरवा रंग आणि 'उमामी' चव
• जगातील सर्वात मोठा उत्पादक → चीन























