
चालू घडामोडी | शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
• स्वराजाची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक सोहळा पार पडला.
⛳️ छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा :
• मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी महाराजांचा शिवछत्रपती म्हणून उच्चार करत महाराजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवली आणि स्वराज्याच्या धन्याचा मोठ्या दिमाखात राज्याभिषेक सोहळा पार पडला.
• छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेका प्रसंगी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा देखील अभिषेक करण्यात आला.
• राज्याभिषेकामुळे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून "राज्याभिषेक शक" सुरू करण्यात आले.
राज्याभिषेकाप्रसंगी “ श्री राजा शिवछत्रपती” ही अक्षरे कोरली गेली.
• स्वराज्याची नाणी छापण्यात आली यांमध्ये सोन्याचा हून तर तांब्याची शिवराई ही खास नाणी होती.
• तत्कालीन राजमुद्रेवर संस्कृत भाषेत
ㅤㅤㅤㅤप्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।
ㅤㅤㅤㅤशाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

• याचा अर्थ "शहाजींचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोर प्रमाणे वाढत जाणारे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे." असं होतो.

• छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हेन्री ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता.
• त्यांनी संपूर्ण सोहळ्याची अतिशय विस्तृत व सखोल माहिती आपल्या डायरीत नमूद केली आहे हा इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो.
• स्वराज्याच्या केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाचे अंग म्हणून अष्टप्रधान मंडळ ओळखले जाते, हे अष्टप्रधान मंडळ शिवराज्याभिषेकाच्या वेळी अस्तित्वात आले.

सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक सोहळा -----रोजी झाला.
(महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस 2023, SRPF 2018,....)
- 6 जून 1674
- 6 जानेवारी 1874
- 6 जून 1774
- 6 जानेवारी 1574
उत्तर : 6 जून 1674
प्रश्न) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : भंडारा 2023)
- पेशवा
- अमात्य
- सचिव
- मंत्री
उत्तर : पेशवा
प्रश्न) 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : अहमदनगर 2023)
- शिवनेरी
- प्रतापगड
- रायगड
- राजगड
उत्तर : रायगड
प्रश्न) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ------ हा इंग्रज वकील उपस्थित होता.
(महाराष्ट्र पोलीस भरती : ठाणे ग्रामीण पोलीस 2023)
- फिलीप गिफर्ड
- रिचर्ड टेलर
- हेन्री ॲाक्सिडेन
- हेन्री रिवेन्दन
उत्तर : हेन्री ॲाक्सिडेन
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता. त्यांनी संपूर्ण सोहळ्याची अतिशय विस्तृत व सखोल माहिती आपल्या डायरीत नमूद केली आहे. हा इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो.

















