
चालू घडामोडी | 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' प्रकल्प

Mumbai-Ahmedabad High-Speed Rail Project
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - पायाभूत सुविधा
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पहिल्या 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' प्रकल्पाची (MAHSR) प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था खालीलपैकी कोणती आहे ?
- दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC)
- भारतीय रेल्वे विकास महामंडळ (IRCON)
- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)
- महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Maharail)
उत्तर : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)
📰 बातमी काय ?
• मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (MAHSR) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील पालघर येथे तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे (Third Mountain Tunnel) काम यशस्वीरित्या पूर्ण (Breakthrough) झाले आहे.
• भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या बांधकामातील हा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा मानला जात आहे.

🤔 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' प्रकल्पाची (MAHSR) प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था कोणती ?
• या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (NHSRCL) या संस्थेद्वारे केली जात आहे.
🧐 अभियांत्रिकी वैशिष्ट्ये आणि तांत्रिक पार्श्वभूमी :
1) परदेशी तंत्रज्ञान -
• हा भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असून, तो जपानच्या जगप्रसिद्ध 'शिनकानसेन' (Shinkansen) तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केला जात आहे.
• पालघरमधील हा बोगदा अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक आणि खडतर भूप्रदेशावर मात करून पूर्ण करण्यात आला आहे.
2) प्रकल्पाची लांबी व संरेखन (Alignment) -
• मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. याचे प्रादेशिक विभाजन खालीलप्रमाणे आहे -
• गुजरात आणि दादरा व नगर हवेली → 352 किमी.
• महाराष्ट्र → 156 किमी.
• भौतिक प्रगती (March 2026 पर्यंत): मार्च 2026 च्या अधिकृत आकडेवारीनुसार, या प्रकल्पाचे काम गुजरातमध्ये 68.19% तर महाराष्ट्रात 40.66% पूर्ण झाले आहे.
✍️ उद्दिष्टे आणि आगामी टप्पे (Targets & Connectivity) :
1) प्रवास वेळेत घट - हा हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणार असून, त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे.
2) पहिला कार्यान्वित टप्पा (First Operational Section) - गुजरात राज्यातील 'सुरत ते बिलीमोरा' दरम्यानचा बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 15 ॲागस्ट 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
3) अंतिम उद्दिष्ट (Final Target) - हा संपूर्ण 508 किमीचा कॉरिडॉर डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे
• मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे → भारताची पहिली बुलेट ट्रेन
• वापरण्यात आलेले तंत्रज्ञान → शिनकानसेन तंत्रज्ञान (जपान)
• प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था → नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)
• कॉरिडॉरची एकूण लांबी → 508 km (गुजरात: 352 किमी, महाराष्ट्र: 156 किमी)
• बुलेट ट्रेन चा वेग ( Speed) → 320 किमी. प्रति तास
• संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे अंतिम लक्ष्य → डिसेंबर 2029





















