
चालू घडामोडी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले 'सेवातीर्थ'चे उद्घाटन

Prime Minister inaugurated 'Seva Teerth'
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘सेवा तीर्थ (Seva Teerth)’ हा नवा प्रशासकीय संकुल कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे ?
1. स्मार्ट सिटी मिशन
2. सागरमाला प्रकल्प
3. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प
4. डिजिटल इंडिया मिशन
उत्तर : सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक प्रशासकीय संकुलाचे उद्घाटन केले.
• हे संकुल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा भाग आहे.

सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प नेमका काय आहे ?
• सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प (Central Vista Redevelopment Project) हा नवी दिल्लीतील भारताच्या प्रशासकीय केंद्राचा (Power Corridor) सर्वांगीण आधुनिकीकरण व पुनर्बांधणी करण्याचा मोठा सरकारी प्रकल्प आहे.
👉 दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या भागाला Central Vista म्हणतात.
👉 या संपूर्ण परिसरातील जुनी इमारती, संसद, कार्यालये आणि पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचा प्रकल्प म्हणजे सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प.
🧐 सेवा तीर्थ म्हणजे काय ?
• ‘सेवा तीर्थ’ हे एक एकात्मिक (Integrated) प्रशासकीय संकुल आहे, जिथे देशातील प्रमुख निर्णय घेणाऱ्या संस्थांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
👉 यामध्ये समाविष्ट:
• पंतप्रधान कार्यालय (PMO)
• राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS)
• कॅबिनेट सचिवालय
✍️ यामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम, समन्वयित आणि जलद निर्णयक्षम बनते.
नावाचा अर्थ (Philosophical Meaning) :
• ‘सेवा तीर्थ’ नावाचा अर्थ - जनतेची सेवा करणारे पवित्र प्रशासनिक केंद्र
• संकुलावर “नागरिक देवो भव” (Citizen is like God) असा संदेश देण्यात आला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :
• जवळपास 80 वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) स्थान बदलले.
• पूर्वी PMO साउथ ब्लॉक मध्ये कार्यरत होते.
वास्तुशिल्प वैशिष्ट्ये :
1) डिझाइन(आर्किटेक्ट) — डॉ. बिमल पटेल
2) प्रेरणा (Architecture Inspiration)
• चालुक्यकालीन मंदिरांची दगडी जाळी (Stone Screen-Work)
• फुलांच्या भूमितीय आकृत्या (Floral Geometric Motifs)
• बौद्ध स्तूपांपासून प्रेरित धातूचे घुमट (Metal Domes)

🤔 ‘सेवा तीर्थ’ संकुलात घेतलेला पहिला निर्णय कोणता ?
• सेवा तीर्थ येथे घेतलेल्या आपल्या पहिल्या निर्णयात, पंतप्रधानांनी रस्ते अपघातातील पीडितांना खात्रीशीर रुग्णालयीन उपचार आणि सुविधा देण्यासाठी ‘पीएम राहत योजना’ (PM RAHAT Scheme) सुरू केली.
• जेणेकरून तात्काळ वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे कोणाचाही जीव जाणार नाही.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : सेवा तीर्थ
• सेवा तीर्थ — नवे प्रशासकीय संकुल
• समावेश — पंतप्रधान कार्यालय + राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय + कॅबिनेट सचिवालय
• प्रकल्प — सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प
• आर्किटेक्ट — डॉ. बिमल पटेल
• उद्घाटन — 13 फेब्रुवारी (नवी दिल्ली 1931 चा संदर्भ)
• बोधवाक्य — “नागरिक देवो भव”
• पहिला निर्णय — पीएम राहत योजना

















