
चालू घडामोडी | लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव
Removal of the Lok Sabha Speaker
Subject : GS - राज्यशास्त्र - संसद
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटविण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ?
1. कलम 101
2. कलम 94
3. कलम 32
4. कलम 100
उत्तर : कलम 94
बातमी काय ?
• अलीकडे काही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटविण्यासाठी नोटीस दिली.
• विरोधकांनी अध्यक्षांवर पक्षपाती वर्तन केल्याचा आरोप केला असून विशेषतः विरोधी पक्षनेत्याला (LoP) बोलण्याची परवानगी न दिल्याचा मुद्दा मांडला आहे.
• यामुळे लोकसभा अध्यक्ष हटविण्याच्या घटनात्मक प्रक्रियेची चर्चा पुन्हा सुरू झाली.
✍️ संकल्पना स्पष्टता : लोकसभा अध्यक्ष हटविणे :
• लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना सभागृहाच्या ठरावाद्वारे पदावरून हटविता येते.
• ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 94 मध्ये दिली आहे.
📖 कलम 94 नुसार अध्यक्षाचे पद खालील परिस्थितीत रिक्त होते :
1) सदस्यत्व संपल्यास - कलम 94(a)
• जर अध्यक्ष लोकसभेचे सदस्य राहिले नाहीत तर त्यांचे पद आपोआप संपते.
2) राजीनामा दिल्यास - कलम 94(b)
• अध्यक्ष उपाध्यक्षांना लेखी राजीनामा देऊ शकतात.
3) सभागृहाच्या ठरावाने हटविल्यास - कलम 94(c)
• लोकसभेतील सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर झाल्यास अध्यक्षांना पदावरून हटविता येते.
📖 अध्यक्ष हटविण्याची प्रक्रिया :
1) 14 दिवसांची पूर्वसूचना :
• अध्यक्ष हटविण्याचा ठराव मांडण्यासाठी किमान 14 दिवस आधी लेखी नोटीस द्यावी लागते.
• ही नोटीस लोकसभा सचिव-जनरल यांच्याकडे दिली जाते.
2) ठरावाला सभागृहाची परवानगी :
• ठराव सभागृहात घेतल्यावर किमान 50 खासदारांनी उभे राहून समर्थन दाखवणे आवश्यक असते.
• जर 50 पेक्षा कमी सदस्य समर्थन देत असतील तर ठराव पुढे घेतला जात नाही.
3) चर्चा :
• ठराव स्वीकारल्यानंतर सभागृहात चर्चा केली जाते.
• चर्चा फक्त ठरावात नमूद केलेल्या आरोपांपुरतीच मर्यादित असते.
4) मतदान :
• अध्यक्ष हटविण्यासाठी ठरावाला सभागृहातील सर्व विद्यमान सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता असते.
• याला “प्रभावी बहुमत” (Effective Majority) म्हणतात.
🧐 “प्रभावी बहुमत” (Effective Majority) म्हणजे काय ?
• सभागृहातील सर्व विद्यमान सदस्यांच्या बहुमताने घेतलेला निर्णय, परंतु रिक्त जागा (vacant seats) वगळून.
👉 सोप्या भाषेत :
• Effective Majority = (एकूण सदस्यसंख्या – रिक्त जागा) यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचे समर्थन
उदाहरण (समजण्यासाठी) -
• लोकसभेची एकूण सदस्यसंख्या = 543
• समजा 5 जागा रिक्त आहेत.
• म्हणजे विद्यमान सदस्य = 538 = (543-5)
✍️ Effective Majority साठी आवश्यक मतसंख्या :
• 538 ÷ 2 = 269 पेक्षा जास्त
• म्हणजे किमान 270 मते लागतील.

📍 कार्यवाहीदरम्यान अध्यक्षाची भूमिका :
✍️ कलम 96 नुसार :
• अध्यक्ष स्वतःवरच्या ठरावाच्या वेळी सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत.
• मात्र ते चर्चेत भाग घेऊ शकतात.
• ते साधा मतदान करू शकतात, पण निर्णायक मत (Casting Vote) देऊ शकत नाहीत.
विशेष बाब :
• लोकसभा विसर्जित (Dissolution) झाल्यानंतरही अध्यक्ष नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत पदावर राहतात.
• परंतु हटविण्याचा ठराव मंजूर झाल्यास त्यांना तात्काळ पद सोडावे लागते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :
• भारतात आतापर्यंत अध्यक्षांविरुद्ध 3 वेळा हटविण्याचे ठराव मांडले गेले आहेत.
1. 1954 — जी. व्ही. मावळंकर
2. 1966 — हुकम सिंग
3. 1987 — बलराम जाखड
👉 परंतु आजपर्यंत कोणताही लोकसभा अध्यक्ष हटविला गेलेला नाही.
कायदेशीर चौकट :
• भारतीय राज्यघटना — कलम 94
• कलम 96 — अध्यक्षाची भूमिका (Removal Motion दरम्यान)
• लोकसभा नियमावली — नियम 200 ते 203
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• लोकसभा अध्यक्ष हटविण्याची तरतूद — कलम 94(c)
• 14 दिवसांची नोटीस आवश्यक
• किमान 50 खासदारांचे समर्थन आवश्यक
• मतदान प्रकार — “प्रभावी बहुमत” (Effective Majority)
• अध्यक्ष हटविण्या दरम्यान ती व्यक्ती अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही
• अध्यक्ष निर्णायक मत (Casting Vote) देऊ शकत नाहीत
• भारतात आजपर्यंत कोणताही लोकसभा अध्यक्ष हटविला गेलेला नाही


















