
चालू घडामोडी | नेटवर्क रेडिनेस निर्देशांक

Network Readiness Index
Subject : GS - निर्देशांक (Index)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नेटवर्क रेडिनेस निर्देशांक (NRI) 2025 संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
1. हा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाकडून प्रकाशित केला जातो.
2. हा निर्देशांक फक्त इंटरनेट वेगावर आधारित असतो.
3. हा निर्देशांक देश माहिती व दळणवळण तंत्रज्ञान आधारित विकास मोजतो.
4. यात फक्त विकसित देशांचा समावेश असतो.
उत्तर : हा निर्देशांक देश माहिती व दळणवळण तंत्रज्ञान आधारित विकास मोजतो.
📰 बातमी काय ?
• फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस निर्देशांक 2025 अहवालानुसार भारताने 4 स्थानांची प्रगती करत जागतिक स्तरावर 45 वे स्थान मिळवले आहे.
🌐 नेटवर्क रेडिनेस निर्देशांक (NRI) म्हणजे काय ?
• Network Readiness Index (NRI) हा जागतिक स्तरावरील निर्देशांक आहे,
✍️ जो एखादा देश माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (ICT) चा वापर करून -
• आर्थिक वाढ
• नवोपक्रम (Innovation)
• शासन कार्यक्षमता
• सामाजिक विकास - किती प्रभावीपणे साध्य करतो हे मोजतो.
🤔 नेटवर्क रेडिनेस निर्देशांक (NRI) कोण प्रकाशित करतो ?
• नेटवर्क रेडिनेस निर्देशांक (NRI) अहवाल पोर्तुलान्स इन्स्टिट्यूट ( Portulans Institute) प्रकाशित करते.
• ही संस्था वॉशिंग्टन डीसी येथील स्वतंत्र, संशोधन आणि शैक्षणिक संस्था आहे.
🏗️ नेटवर्क रेडिनेस निर्देशांकात देशांचे मूल्यांकन कसे केले जाते ?
👉 ब्रॉडबँड कनेक्शन, AI संशोधन उत्पादन, डिजिटल व्यापार, कायदे आणि बाजार प्रमाण यासह 53 निर्देशकांचा वापर देशांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो.
✍️ नेटवर्क रेडिनेस निर्देशांक मूल्यांकन पुढील 4 मुख्य स्तंभांवर आधारित आहे :
1) तंत्रज्ञान (Technology) :
• डिजिटल पायाभूत सुविधा, इंटरनेट प्रवेश, भविष्यातील तंत्रज्ञान.
2) लोक (People) :
• डिजिटल कौशल्ये, समावेशकता, कार्यबलाची तयारी.
3) शासन (Governance) :
• नियमावली, सायबर सुरक्षा, विश्वास व धोरणात्मक वातावरण.
4) परिणाम (Impact) :
• आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय परिणाम.
🇮🇳 नेटवर्क रेडिनेस निर्देशांक 2025 मध्ये भारताची कामगिरी :
• या अहवालानुसार भारताने 4 स्थानांची सुधारणा करत जागतिक स्तरावर 45वे स्थान मिळवले आहे.
• भारताचा गुणसंख्या (Score) देखील वाढला असून 2024 मध्ये (100 पैकी) 53.63 वरून 2025 मध्ये (100 पैकी) 54.43 पर्यंत सुधारणा झाली आहे.
1) भारताचा जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक -
✍️ भारताने खालील निर्देशकांमध्ये जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे :
• दूरसंचार सेवांमधील वार्षिक गुंतवणूक
• कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक वैज्ञानिक प्रकाशने
• ICT सेवा निर्यात
• ई-कॉमर्स कायदे
2) मजबूत पायाभूत सुविधा : दुसरा क्रमांक
✍️ भारताने खालील निर्देशकांमध्ये जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला आहे :
• FTTH / बिल्डिंग इंटरनेट सदस्यता
• देशांतर्गत मोबाइल ब्रॉडबँड इंटरनेट ट्रॅफिक
• आंतरराष्ट्रीय इंटरनेट बँडविड्थ
3) बाजारपेठेचा आकार : तिसरा क्रमांक
• भारत देशांतर्गत डिजिटल बाजारपेठेच्या आकारात तिसऱ्या क्रमांकावर आहे,
• जे त्याच्या मोठ्या आणि डिजिटलदृष्ट्या सक्रिय ग्राहकवर्गाचे द्योतक आहे.
🎯 या प्रगतीचे महत्त्व :
• भारताची डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत होत आहे.
• AI व डिजिटल व्यापार क्षेत्रात जागतिक स्पर्धात्मकता वाढत आहे.
• डिजिटल अर्थव्यवस्था राष्ट्रीय विकासाचा मुख्य आधार बनत आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : नेटवर्क रेडिनेस निर्देशांक
• NRI 2025 → भारत 45 वा क्रमांक
• गुणसंख्या → 54.43 (100 पैकी)
• प्रकाशित संस्था → पोर्तुलान्स इन्स्टिट्यूट
• मूल्यांकन → 127 देश
• स्तंभ → तंत्रज्ञान, लोक, शासन, परिणाम
• प्रथम क्रमांक → AI प्रकाशने, ICT निर्यात, दूरसंचार गुंतवणूक, ई-कॉमर्स कायदे


















