
चालू घडामोडी | झोडिया समुदाय आणि सौरा भाषा

Jhodia Community and Soura Language
Subject : GS - राज्यशास्त्र - अनुसूचित जमाती, कलम 342
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ओडिशा सरकारने कोणत्या समुदायाला अनुसूचित जमाती (ST) यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, जो ORGI ने पाठिंबा न देता राज्याकडे परत पाठवला ?
1. डोंगरिया कोंध
2. भुईयां
3. झोडिया
4. बोंडा
उत्तर : झोडिया (Jhodia)
📰 बातमी काय ?
• अलीकडे ओडिशा सरकारने झोडिया समुदायाला अनुसूचित जमाती (ST) यादीत समाविष्ट करण्याचा आणि सौरा (Soura) भाषेला आठव्या अनुसूचीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
• मात्र केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले की रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (ORGI) यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले नाही.
• त्यामुळे हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पुन्हा विचारासाठी पाठवण्यात आला आहे.
🏞️ झोडिया (Jhodia) समुदाया बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
🔎 भौगोलिक क्षेत्र :
• झोडिया (झोडिया परजा) समुदाय प्रामुख्याने ओडिशातील कोरापुट, रायगडा आणि कालाहांडी जिल्ह्यांत आढळतो.
📜 ऐतिहासिक स्थिती :
• पूर्वी झोडिया समुदायाला परजा (Paroja) जमाती सारखे मानले जात होते.
• त्यामुळे 1997 पर्यंत त्यांना अनुसूचित जमाती (Schedule Tribe) साठीचे लाभ मिळत होते.
⚖️ सध्याची समस्या :
• 1997 नंतर स्वतंत्र ओळख नोंदली गेल्यामुळे झोडिया समुदायाला आता अनुसूचित जमाती (ST) साठीचे लाभ मिळत नाही तसेच त्यासाठी त्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या.
• त्यामुळे झोडिया समुदायाला पुन्हा ST यादीत समाविष्ट करण्याची मागणी ते करत आहे.
📉 झोडिया समुदायाची सामाजिक-आर्थिक स्थिती :
• भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात वास्तव
• उपजीविका प्रामुख्याने मागासलेली आणि केवळ उपजिविकेसाठी शेती (Subsistence Agriculture) करतात आणि जंगलावर अवलंबून आहे.
• शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण
🗣️ सौरा (Soura / Saora) भाषे बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• सौरा भाषा ही सौरा (Saora) जमातीद्वारे बोलली जाते.
• सौरा भाषा ऑस्ट्रोएशियाटिक (मुंडा) भाषा कुटुंबातील आहे.
✍️ लिपी :
• सोरंग सोमपेंग (Sorang Sompeng) ही सौरा भाषेची स्वतंत्र लिपी आहे.
• ही लिपी 1936 मध्ये मंगेई गोमांगो (Mangei Gomango) यांनी विकसित केली.
🏛️ आठवी अनुसूची संदर्भ :
• सौरा भाषा सध्या भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाही.
• त्यामुळे तिला अधिकृत मान्यता, शैक्षणिक पाठबळ आणि संवर्धनासाठी मदत मिळण्यासाठी अडचणी येतात.
📖 आठवी अनुसूची म्हणजे काय ?
📖 What is the 8th Schedule ?
• भारतीय संविधानातील आठवी अनुसूचीमध्ये सध्या 22 भाषा समाविष्ट आहेत.
• या भाषांना अधिकृत मान्यता, UPSC परीक्षा माध्यम, साहित्य अकादमी समर्थन इ. लाभ मिळतात.
🏛 अनुसूचित जमाती (Schedule Tribe) यादी – घटनात्मक आधार
📌 घटनात्मक तरतूद :
• अनुसूचित जमातींची यादी भारतीय संविधानाच्या कलम 342 अंतर्गत जाहीर केली जाते.
🔹 कलम 342(1) :
• राष्ट्रपती, संबंधित राज्याच्या राज्यपालांशी सल्लामसलत करून, त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी कोणत्या जमाती ST म्हणून घोषित करायच्या ते अधिसूचित करतात.
🔹 कलम 342(2) :
• एकदा यादी जाहीर झाल्यानंतर त्यात समावेश किंवा वगळणे फक्त संसदेमार्फत कायद्यानेच करता येते.
🔹 टप्पा 1: राज्य सरकारची शिफारस :
• संबंधित राज्य सरकार प्रस्ताव तयार करून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाकडे (Ministry of Tribal Affairs) पाठवते.
🔹 टप्पा 2: रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (ORGI) तपासणी :
• Office of the Registrar General of India (ORGI) संस्था सामाजिक-ऐतिहासिक व लोकसंख्याशास्त्रीय माहितीची पडताळणी करते.
• तो आपले मत (approval / non-approval) देतो.
🔹 टप्पा 3: राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) :
• ORGI च्या मतानंतर प्रस्ताव NCST कडे पाठवला जातो.
• आयोग आपली शिफारस देतो.
🔹 टप्पा 4: केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय :
• सर्व शिफारशींचा विचार करून प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जातो.
• मंत्रिमंडळ मान्यता दिल्यास पुढील विधायी प्रक्रिया सुरू होते.
🔹 टप्पा 5: संसदेमध्ये विधेयक (Amendment Bill) :
• संबंधित राज्यासाठी ST यादीत बदल करण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले जाते.
• लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांची मंजुरी आवश्यक.
🔹 टप्पा 6: राष्ट्रपतींची संमती (Presidential Assent) :
• संसदेमार्फत विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींची संमती मिळते.
• त्यानंतरच तो बदल कायदेशीरदृष्ट्या लागू होतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : झोडिया समुदाय
• झोडिया (Jhodia Paraja) → ओडिशा
• सौरा भाषा → ऑस्ट्रोएशियाटिक (मुंडा) कुटुंब
• सोरंग सोमपेंग लिपी → 1936, मंगेई गोमांगो यांनी विकसित केली.
• कलम 342 → अनुसूचित जमातींची यादी
• ORGI → जात/जमात ओळख पडताळणीतील महत्त्वाची संस्था
• आठवी अनुसूची → सध्या 22 भाषा


















