
चालू घडामोडी | अर्थसंकल्पात भारताला जागतिक बायोफार्म हब बनवण्यावर भर
What is Biopharma SHAKTI ?
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अर्थसंकल्पात मांडलेल्या बायोफार्मा शक्ती (Biopharma SHAKTI) या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे ?
1. जनरिक औषध उत्पादन वाढवणे
2. भारताला जागतिक जैव-औषधनिर्मिती केंद्र बनवणे
3. आयुर्वेद संशोधनाला चालना देणे
4. वैद्यकीय पर्यटन वाढवणे
उत्तर : भारताला जागतिक जैव-औषधनिर्मिती केंद्र बनवणे
📰 बातमी काय ?
• केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये ‘Biopharma SHAKTI’ ही योजना/ उपक्रम जाहीर करण्यात आली.
• पुढील 5 वर्षांत ₹ 10,000 कोटींची गुंतवणूक करून भारतात जैविक औषधे (Biologics) आणि जैवसदृश औषधांचे (Biosimilars) उत्पादन वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे.
बायोफार्मा शक्ती म्हणजे काय ?
• 'बायोफार्मा शक्ती (ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाद्वारे आरोग्यसेवा उन्नतीसाठी धोरण)'
• ‘Biopharma SHAKTI (Strategy for Healthcare Advancement through Knowledge, Technology & Innovation)’
• SHAKTI फूल फॅार्म Strategy for Healthcare Advancement through Knowledge, Technology & Innovation
💊 भारत जनरिक (Generic) मध्ये मजबूत आहे — तरी नवीन योजना का ?
• भारत जगात “Pharmacy of the World” म्हणून ओळखला जातो.
• पण ही ताकद प्रामुख्याने जनरिक (Generic) औषधांमध्ये आहे.
• आज जागतिक औषध बाजारात सर्वाधिक वाढ Biologics या उच्च-मूल्य औषधांमध्ये होत आहे.
• ही औषधे महाग, तंत्रज्ञानाधारित आणि संशोधनकेंद्रित असतात.
• म्हणूनच सरकार Generic वरून Biopharma कडे झेप घेत आहे.
💊 Generic म्हणजे काय ?
• Generic औषध म्हणजे मूळ औषधाचा पेटंट (Patent) संपल्यानंतर तयार केलेली अचूक रासायनिक प्रत.
✍️ ही औषधे -
• रासायनिक प्रक्रियेतून तयार होतात
• तुलनेने स्वस्त असतात
• भारत या क्षेत्रात जागतिक अग्रणी आहे.
🧬 जैविक औषधे (Biologics) म्हणजे काय ?
• Biologics म्हणजे जिवंत पेशी, सूक्ष्मजीव, प्रथिने किंवा जैविक घटकांपासून तयार होणारी औषधे.
उदाहरणे: लसी, इन्सुलिन, Monoclonal antibodies (कर्करोग उपचारासाठी).
✍️ ही औषधे -
• अत्यंत गुंतागुंतीची असतात
• उत्पादन प्रक्रिया क्लिष्ट असते
• किंमत जास्त असते
🧪 जैवसदृश औषधांचे (Biosimilars) म्हणजे काय ?
• जेव्हा एखाद्या जैविक (Biologics) औषधाचा पेटंट (Patent) संपतो, तेव्हा त्यास अत्यंत साम्य असलेली नवीन आवृत्ती तयार केली जाते. तिला जैवसदृश (Biosimilar) म्हणतात.
(नोट : 🚨 Exam Trap लक्षात ठेवा - Biosimilar म्हणजे Generic नाही.)
• Generic = अचूक रासायनिक प्रत
• Biosimilar = अत्यंत साम्य, पण पूर्णपणे तंतोतंत नाही, कारण जैविक औषधांची रचना अत्यंत जटिल असते.

🏛 सरकारची रणनीती काय आहे ?
या योजनेअंतर्गत :
• 3 नवीन राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (NIPERs) स्थापन केल्या जातील.
• 7 विद्यमान संस्थांचे उन्नतीकरण (Upgradation) केले जाईल
• 1000+ मान्यताप्राप्त क्लिनिकल चाचणी स्थळे (Clinical Trial Sites) विकसित केल्या जातील
• औषध मंजुरी प्रक्रिया मजबूत करण्यासाठी Central Drugs Standard Control Organisation यांना जागतिक मानकांनुसार सक्षम केले जाईल
• यामुळे संशोधन → उत्पादन → चाचणी → मंजुरी
• या सर्व टप्प्यांत सुसंगत ecosystem तयार होईल.
(NIPERs फूल फॅार्म - National Institutes of Pharmaceutical Education and Research)
🌍 ही योजना आत्ता का महत्त्वाची ?
• COVID-19 नंतर आरोग्य सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा भाग बनली आहे.
• उच्च-मूल्य औषधांसाठी परदेशावर अवलंबून राहणे धोरणात्मकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते.
• ✍️ Biopharma क्षेत्रात गुंतवणूक केल्यास :
➥ 💰 निर्यात वाढेल
➥ 🧬 उच्च तंत्रज्ञान विकसित होईल
➥ 👩🔬 कौशल्याधारित रोजगार निर्माण होतील
➥ 🌍 भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : बायोफार्मा शक्ती
• घोषणा – अर्थसंकल्प 2026-27
• निधी – ₹10,000 कोटी (5 वर्षे)
• उद्देश – Global Biopharma Hub
• Focus – Biologics आणि Biosimilars
• 3 नवीन NIPER + 7 upgrade
• 1000+ Clinical Trial Sites
• CDSCO बळकटीकरण






















