
चालू घडामोडी | भारत टॅक्सी

Bharat Taxi
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही सेवा कोणत्या वैशिष्ट्यामुळे चर्चेत आहे ?
1. ही पूर्णपणे परदेशी गुंतवणुकीवर आधारित सेवा आहे
2. ही भारतातील पहिली सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा आहे
3. ही केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी सेवा आहे
4. ही केवळ सरकारी अधिकाऱ्यांसाठी सेवा आहे
उत्तर : ही भारतातील पहिली सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा आहे
बातमी काय ?
• भारताची पहिली सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा ‘भारत टॅक्सी’ नवी दिल्ली येथे औपचारिकपणे सुरू करण्यात आली.
• ही सेवा चालक-मालकीच्या (Driver-owned) मॉडेलवर आधारित आहे.
• ही संकल्पना ‘सहकारातून समृद्धी’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
‘भारत टॅक्सी’ म्हणजे काय ?
• ‘भारत टॅक्सी’ ही चालकांच्या मालकीची सहकारी राईड-हेलिंग सेवा आहे.
• या मॉडेलमध्ये चालक (सारथी) हेच भागधारक (Stakeholders) आणि निर्णय घेणारे सदस्य असतात.
• ही सेवा ओला-उबरसारख्या कमिशन-आधारित प्लॅटफॉर्मला देशी पर्याय म्हणून सुरू करण्यात आली आहे.
संबंधित संस्था :
• स्थापना — 6 जून 2025
• सहकार मंत्रालय — धोरणात्मक मार्गदर्शन
• सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड — संचालन संस्था
• मल्टी-स्टेट सहकारी संस्था कायदा, 2002 अंतर्गत नोंदणी
‘भारत टॅक्सी’ चा उद्देश :
• चालकांना मालकी हक्क देऊन सशक्त करणे
• कमिशन-आधारित शोषणापासून मुक्तता
• न्याय्य उत्पन्न वितरण
• सामाजिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करणे
• नागरिक-केंद्रित वाहतूक सेवा विकसित करणे
प्रमुख वैशिष्ट्ये :
1) चालक-मालकी मॉडेल :
‘सारथी ही मालक’ या तत्त्वावर आधारित.
2) शून्य कमिशन पद्धत :
• सुरुवातीला संपूर्ण भाडे चालकाला मिळते.
• नफा सहकारी संस्थेमध्ये वाटप केला जातो.
3) सामाजिक सुरक्षा :
• 5 लाख रुपये अपघात विमा
• 5 लाख रुपये कुटुंब आरोग्य विमा
• निवृत्ती बचत व आपत्कालीन मदत
4) महिला सशक्तीकरण :
• ‘सारथी दीदी’ आणि ‘बाईक दीदी’ उपक्रम
• 150 पेक्षा अधिक महिला चालक सहभागी
5) डिजिटल आणि सुरक्षा सुविधा :
• बहुभाषिक अॅप
• पारदर्शक भाडे
• रिअल-टाइम ट्रॅकिंग
• पोलिस यंत्रणेशी समन्वय
6) नॉन-एक्सक्लुझिव्ह मॉडेल :
• चालक इतर प्लॅटफॉर्मवरही काम करू शकतात.
‘भारत टॅक्सी’ चे महत्त्व :
सहकारी चळवळीला चालना :
• सहकारी क्षेत्र डिजिटल अर्थव्यवस्थेत प्रवेश करत आहे.
चालक कल्याण :
• चालकांचे (Driver) उत्पन्न सुरक्षितता आणि सन्मान वाढतो.
आत्मनिर्भर भारताशी सुसंगती :
• परदेशी निधीवर आधारित अॅग्रीगेटरवर अवलंबित्व कमी.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : भारत टॅक्सी
• ‘भारत टॅक्सी’ — भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा
• मॉडेल — चालक-मालकी (Driver-owned)
• नोंदणी — मल्टी-स्टेट सहकारी संस्था कायदा, 2002
• स्थापना — 6 जून 2025
• तत्त्व — ‘सारथी ही मालक’
• शून्य कमिशन प्रणाली
• ₹ 5 लाख अपघात व आरोग्य विमा
• सुसंगती — सहकारातून समृद्धी, आत्मनिर्भर भारत

























