
चालू घडामोडी | भारत ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्रात सामील
India Joins BRICS Centre for Industrial Competencies
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताने अलीकडेच ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ (BCIC) मध्ये सहभाग नोंदवला आहे. हे केंद्र प्रामुख्याने कशासाठी कार्य करते ?
1. BRICS देशांमध्ये औद्योगिक कर्जपुरवठा करण्यासाठी
2. उत्पादन उद्योग व MSMEs साठी प्रगत तंत्रज्ञान व Industry 4.0 क्षमता-विकासासाठी
3. BRICS देशांमधील व्यापार करार सुलभ करण्यासाठी
4. संरक्षण उद्योगातील तांत्रिक सहकार्यासाठी
उत्तर : उत्पादन उद्योग व MSMEs साठी प्रगत तंत्रज्ञान व Industry 4.0 क्षमता-विकासासाठी
📰 बातमी काय ?
अलिकडेच भारत, ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ (BCIC) यामध्ये सामील झाला आहे.

🏢 ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ म्हणजे काय ?
What is BRICS Centre for Industrial Competencies ?
• BRICS Centre for Industrial Competencies हे एक बहुपक्षीय (multilateral) सार्वजनिक–खाजगी व्यासपीठ आहे.
• संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक विकास संघटनेच्या सहयोगाने सुरू केलेले ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र, ब्रिक्स देशांमधील उत्पादन कंपन्या आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकात्मिक समर्थन सेवा प्रदान करणारे एक-सेवा केंद्र म्हणून काम करते.
🎯 ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ या उपक्रमाचा उद्देश काय ?
• नवीन औद्योगिक क्रांती (New Industrial Revolution) म्हणजेच Industry 4.0 — ज्यामध्ये ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल उत्पादन प्रणालींचा समावेश होतो.
• BCIC हे या संक्रमण प्रक्रियेत उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे.
• ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ (BCIC) चा उद्देश उद्योग 4.0 (Industry 4.0) क्षमता मजबूत करणे हा आहे.
• यात BRICS व BRICS Plus देशांमधील उत्पादन उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSMEs) प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि शाश्वत पद्धती अवलंबण्यासाठी मदत करणे यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
📅 ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ स्थापना व पार्श्वभूमी :
• BCIC ची स्थापना 2024–25 दरम्यान करण्यात आली.
• हे केंद्र संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक विकास संघटने च्या (United Nations Industrial Development Organization - UNIDO) च्या सहयोगाने सुरू करण्यात आले.
🏭 भारतासाठी याचे महत्त्व काय ?
• भारतामध्ये MSME क्षेत्र रोजगार निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
• BCIC मध्ये सहभागी झाल्यामुळे:
• भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळेल
• प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होईल
• डिजिटल परिवर्तनाला चालना मिळेल
• “Make in India” आणि औद्योगिक आधुनिकीकरणाला बळकटी मिळेल
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : BCIC
• भारताचा सहभाग : फेब्रुवारी 2026
• लक्ष – उत्पादन उद्योग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs)
• उद्देश – औद्योगिक स्पर्धात्मकता व उत्पादकता वाढवणे
• प्रगत उत्पादन तंत्रज्ञान व डिजिटल रूपांतरणाला चालना
• Industry 4.0 — ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल उत्पादन





















