
चालू घडामोडी | भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा ?
India's rank in Corruption Perceptions Index
Subject : GS - जागतिक संघटना - निर्देशांक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे प्रसिद्ध झालेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (Corruption Perceptions Index – CPI) 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
1. 96
2. 91
3. 76
4. 107
उत्तर : 91
बातमी काय ?
• नुकताच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2025 प्रकाशित केला.
• या अहवालात 182 देशांमधील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पातळी मोजण्यात आली आहे.
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा ?
(Corruption Perceptions Index – CPI)
• या निर्देशांकात भारताचा क्रमांक 91 वा असून भारताला 39 गुण मिळाले आहेत.
• मागील वर्षी भारताचा क्रमांक 96 वा होता, त्यामुळे भारताची स्थिती थोडी सुधारली आहे. 
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) म्हणजे काय ?
• भ्रष्टाचार धारणा निर्देशांक हा जगातील विविध देशांमधील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराची धारणा (Perception) मोजणारा जागतिक निर्देशांक आहे.
• या निर्देशांकात तज्ञांचे सर्वेक्षण, व्यावसायिक संस्थांचे अहवाल आणि विविध डेटा स्रोतांच्या आधारे देशांना गुण दिले जातात.
• हा निर्देशांक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था दरवर्षी प्रकाशित करते. 
गुणांकन पद्धती :
• CPI मध्ये देशांना 0 ते 100 या स्केलवर गुण दिले जातात.
1. 0 गुण : अत्यंत भ्रष्ट देश
2. 100 गुण : अत्यंत स्वच्छ प्रशासन
✍️ ज्या देशाला जास्त गुण मिळतात तो देश कमी भ्रष्ट मानला जातो.
CPI 2025 नुसार सर्वात कमी 3 भ्रष्ट देश :
• डेन्मार्क 🇩🇰 – 89 गुण (सलग 8 वर्षे पहिला क्रमांक)
• फिनलँड 🇫🇮
• सिंगापूर 🇸🇬
✍️ हे देश पारदर्शक प्रशासन व मजबूत संस्थांसाठी प्रसिद्ध आहेत. 
CPI 2025 नुसार सर्वात जास्त 3 भ्रष्ट देश :
• दक्षिण सूदान 🇸🇸 – 9 गुण
• सोमालिया 🇸🇴 – 9 गुण
• व्हेनेझुएला 🇻🇪 – 10 गुण
✍️ यामागे प्रामुख्याने राजकीय अस्थिरता, संघर्ष आणि कमजोर प्रशासन कारणीभूत आहेत. 
CPI 2025 नुसार भारत - शेजारील देश आणि दक्षिण आशियातील देशांची स्थिती :
• भूतान 🇧🇹 – 18 वा (71 गुण)
• चीन 🇨🇳 – 76 वा
• भारत 🇮🇳 – 91 वा (39 गुण)
• मालदीव 🇲🇻 – 91 वा
• श्रीलंका 🇱🇰 – 107 वा
• नेपाळ 🇳🇵– 109 वा
• पाकिस्तान 🇵🇰 – 136 वा
• बांगलादेश 🇧🇩 – 150 वा
✍️ यावरून भारताची स्थिती दक्षिण आशियातील अनेक देशांपेक्षा चांगली असली तरी भूतान व चीनपेक्षा मागे आहे. 

🧐 भ्रष्टाचार धारणा निर्देशांक कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो ?
• भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) हा निर्देशांक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल (Transparency International) या जागतिक नागरी संस्थेद्वारे दरवर्षी प्रकाशित केला जातो.
• स्थापना : 1993
• मुख्यालय : बर्लिन (जर्मनी 🇩🇪)
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI)
• प्रकाशन संस्था — ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
• मुख्यालय — बर्लिन (जर्मनी)
• 2025 — भारताचा क्रमांक 91, गुण 39
• सर्वात कमी भ्रष्ट देश — डेन्मार्क
• सर्वात भ्रष्ट देश — दक्षिण सूदान / सोमालिया


















