
चालू घडामोडी | ‘पीएम स्वनिधि क्रेडिट कार्ड’ योजना

PM SVANidhi Credit Card Scheme
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम स्वनिधि क्रेडिट कार्ड’ योजना कुठे सुरू केली ?
1. चेन्नई
2. हैदराबाद
3. तिरुवनंतपुरम
4. अहमदाबाद
उत्तर : तिरुवनंतपुरम (केरळ)
बातमी काय ?
• अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित कार्यक्रमात ‘पीएम स्वनिधि क्रेडिट कार्ड’ (PM SVANidhi क्रेडिट कार्ड सुरू केले.
🤔 PM SVANidhi फूल फॅार्म काय ?
• Prime Minister Street Vendor’s Atma Nirbhar Nidhi
🧐 ‘पीएम स्वनिधि क्रेडिट कार्ड’ योजना काय आहे ?
• हे क्रेडिट कार्ड स्ट्रीट वेंडर्स (फेरीवाले / रस्त्यावर विक्री करणारे) यांना त्वरित कार्यशील भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी तयार केले आहे.
• हे कार्ड UPI-linked, व्याज नसलेलं (Interest-free) क्रेडिट फॅसिलिटी म्हणून कार्य करते.
• ही योजना लहान विक्रेत्यांना औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडते.
• कार्यक्रमादरम्यान सुमारे 1 लाख लाभार्थ्यांना PM SVANidhi कर्जाचे वितरण देखील करण्यात आले.
✍️ योजना सुरू करण्यामागील गरज :
• अनौपचारिक कर्जावर अवलंबित्व कमी करणे - सावकारांकडून जास्त व्याजाने घेतल्या जाणाऱ्या कर्जावरची अवलंबित्व कमी करून स्वस्त औपचारिक कर्ज उपलब्ध करणे.
• आर्थिक समावेशन (Financial Inclusion) - स्ट्रीट वेंडर्सना बँक खाते, डिजिटल पेमेंट आणि क्रेडिट इतिहासाद्वारे औपचारिक वित्तीय व्यवस्थेत समाविष्ट करणे.
• शहरी सूक्ष्म-उद्योगांना प्रोत्साहन - कार्यशील भांडवल उपलब्ध करून लहान विक्रेत्यांचा व्यवसाय स्थिर ठेवणे व त्यांची वाढ सुलभ करणे.
📍PM SVANidhi Credit Card ची प्रमुख वैशिष्ट्ये -
1) UPI-linked डिजिटल क्रेडिट सुविधा -
• हे क्रेडिट कार्ड UPI शी जोडलेले असून विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करणे सोपे होते.
2) Revolving Credit Facility -
• ठराविक मर्यादेपर्यंत रक्कम वारंवार वापरता येते आणि परतफेड केल्यानंतर पुन्हा उपलब्ध होते.
3) Formal Credit History तयार होते -
• नियमित व्यवहारांमुळे बँकेत क्रेडिट प्रोफाइल तयार होते आणि पुढील मोठ्या कर्जासाठी मदत मिळते.
✍️ लक्ष्यित लाभार्थी :
• स्ट्रीट वेंडर्स
• फेरीवाले
• ठेला / हातगाडी विक्रेते
• फुटपाथवरील लघु विक्रेते
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : PM SVANidhi Credit Card
• उद्दिष्ट : स्ट्रीट वेंडर्सना कर्ज
• सुरू केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
• ठिकाण : तिरुवनंतपुरम, केरळ
• सुविधा : UPI-linked, व्याज नसलेलं क्रेडिट फॅसिलिटी
• योजना कालावधी : 31 मार्च 2030 पर्यंत वाढविण्यात आली



















