
चालू घडामोडी | पीएम- राहत योजना

PM RAHAT Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने अलिकडेच सुरू केलेली ‘पीएम- राहत योजना (PM RAHAT Scheme)’ कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ?
1. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
2. गृहमंत्रालय
3. वित्त मंत्रालय
4. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय
उत्तर : रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय
बातमी काय ?
• ‘सेवा तीर्थ’ या नव्या प्रशासकीय संकुलात घेतलेल्या पहिल्या महत्त्वाच्या निर्णयात केंद्र सरकारने पीएम- राहत योजना (PM RAHAT Scheme) सुरू केली.
• या योजनेचा उद्देश रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ आणि कॅशलेस उपचार उपलब्ध करून देणे हा आहे.
🤔 PM RAHAT योजना म्हणजे काय ?
✍️ PM RAHAT फूल फॅार्म Road Accident Victim Hospitalization and Assured Treatment Scheme.
• ही योजना रस्ते अपघातातील जखमींना अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये (Golden Hour) त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तयार करण्यात आली आहे.
👉 Golden Hour म्हणजे अपघातानंतरचा पहिला 1 तास- कारण या कालावधीत योग्य उपचार मिळाल्यास 50 % मृत्यू टाळता येऊ शकतात.
✍️ मंत्रालय : रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ आणि कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्याचा हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा (Ministry of Road Transport and Highways) एक उपक्रम आहे.
🧐 योजनेची कार्यपद्धती :
• या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना देशातील कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास पहिल्या 7 दिवसांसाठी ₹1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार दिले जातात.
• रुग्णाची स्थिती गंभीर असल्यास अधिक काळासाठी प्राथमिक उपचारांची सोय केली जाते.
तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया :
• ही योजना पूर्णपणे तंत्रज्ञान-आधारित (Technology-driven) असून अपघाताची नोंदणीपासून उपचार खर्चाच्या परतफेडीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने जोडलेली (seamless digital link) आहे.
✍️ यासाठी दोन महत्त्वाच्या प्रणालींचा वापर केला जातो -
1) eDAR (Electronic Detailed Accident Report) - रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाची अपघात नोंद प्रणाली
2) TMS 2.0 (Transaction Management System) - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची (NHA) आर्थिक व्यवहार प्रणाली
👉 या दोन्ही प्रणालींमुळे अपघाताची माहिती, रुग्णालयातील उपचार आणि खर्चाची परतफेड ही प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि समन्वयित होते.
• तसेच 112 या आपत्कालीन मदत क्रमांकाद्वारे रुग्णवाहिका व जवळचे रुग्णालय तत्काळ उपलब्ध करून दिले जाते.
💰निधी व्यवस्था :
• या योजनेचा खर्च मुख्यतः Motor Vehicle Accident Fund (MVAF) मधून केला जातो.
• जर अपघात करणारे वाहन विमाधारक असेल तर विमा कंपन्या खर्च भरतात, आणि Hit-And-Run किंवा विमा नसलेल्या प्रकरणांमध्ये केंद्र सरकार खर्च करते.
महत्त्व :
• या योजनेमुळे अपघातानंतर तात्काळ उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल.
• तसेच कॅशलेस सुविधेमुळे आर्थिक अडचणीमुळे उपचार न मिळण्याची समस्या कमी होते.
• डिजिटल प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : पीएम- राहत योजना
• PM RAHAT योजना → रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ आणि कॅशलेस उपचार
• मंत्रालय → रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय
• कॅशलेस मर्यादा → ₹1.5 लाख (7 दिवस)
• Golden Hour → अपघातानंतरचा पहिला 1 तास
• मदत क्रमांक → 112




















