
चालू घडामोडी | केंद्र सरकारडून ‘वंदे मातरम्’ संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Centre’s New Guidelines on ‘Vande Mataram’
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) ‘वंदे मातरम्’ संदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या मंत्रालयाने जारी केली ?
1. संस्कृती मंत्रालय
2. माहिती व प्रसारण मंत्रालय
3. शिक्षण मंत्रालय
4. गृहमंत्रालय
उत्तर : गृहमंत्रालय
बातमी काय ?
• केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
• या नव्या नियमांनुसार अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये आता गीताची सर्व 6 कडवी गाणे आवश्यक करण्यात आले आहे.
• ही घोषणा या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :
• बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले.
• हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ (1882) या कादंबरीतील असून, स्वातंत्र्य चळवळीत ते देशभक्तीचे शक्तिशाली प्रतीक बनले.
संकल्पना स्पष्टता :
• ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे.
• आता सरकारने या गीताच्या पूर्ण (6 कडव्यांच्या) अधिकृत आवृत्तीला मान्यता देऊन त्याच्या सादरीकरणासाठी निश्चित नियम ठरवले आहेत.
नवीन नियम :
• आता सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ गाताना संपूर्ण 6 कडवी गाणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सुमारे 3 मिनिटे 10 सेकंदांचा कालावधी निश्चित केला आहे.
• भारताच्या राष्ट्रपतींच्या आगमनावेळी आणि प्रस्थानावेळी वाजवले जाईल.
• आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आधी आणि नंतर.
• त्याचबरोबर राज्यपालांच्या भाषणाच्या आधी व नंतर, राज्य समारंभांमध्ये आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये वाजवले/ गाईले जाईल.
• तसेच शाळांच्या प्रार्थना सभांमध्ये, ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समूहगान करणे आवश्यक आहे.
• गीत सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे,
• परंतु चित्रपटगृहात ते बंधनकारक नाही.
• गाण्यापूर्वी वाद्य संकेत दिला जातो आणि मार्चिंगमध्येही ठरावीक पद्धत पाळली जाते.
महत्त्व :
• या निर्णयामुळे ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाला पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.
• तसेच देशभरात एकसारखे नियम लागू झाल्यामुळे सादरीकरणात एकरूपता येईल.
• शाळा व सार्वजनिक कार्यक्रमांमधून राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास मदत होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : ‘वंदे मातरम्’
• मार्गदर्शक तत्त्वे जारी — गृहमंत्रालयाकडून
• ‘वंदे मातरम्’ — राष्ट्रीय गीत
• लेखक — बंकिमचंद्र चॅटर्जी
• सर्व 6 कडवी गाणे बंधनकारक
• कालावधी — 3 मिनिटे 10 सेकंद
• संदर्भ — 150 वा वर्धापन दिन



















