
चालू घडामोडी | Boeing P-8I Poseidon विमाने | P-8I Anti-Submarine Warfare

P-8I Anti-Submarine Warfare
Subject : GS - संरक्षण, आंतरराष्ट्रीय करार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे भारतीय नौदलासाठी अतिरिक्त Boeing P-8I Poseidon विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तर हे विमाने कोणत्या देशाकडून घेण्यात आली ?
1. फ्रान्स
2. रशिया
3. अमेरिका
4. इस्रायल
उत्तर : अमेरिका
बातमी काय ?
• अलिकडे संरक्षण खरेदी मंडळ (Defence Procurement Board – DPB) ने भारतीय नौदलासाठी Boeing P-8I Poseidon ही 6 अतिरिक्त विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
खरेदीचा करार :
• ही खरेदी भारत-अमेरिका आंतरसरकारी करार (Inter-Governmental Agreement – IGA) अंतर्गत करण्यात येत आहे.
• हा करार Defence Acquisition Procedure (DAP) 2020 अंतर्गत प्रक्रिया केला जात आहे.
• या प्रक्रियेत offset clause लागू होत नाही, त्यामुळे या करारामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण किंवा सहउत्पादनाची अट नाही.
भारतीय नौदलासाठी Boeing P-8I Poseidon खरेदी उद्देश -
• ही विमाने अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार असून त्याद्वारे हिंदी महासागर क्षेत्रातील (Indian Ocean Region) भारताची पाळत व युद्धसंबंधी क्षमता वाढवण्याचा उद्देश आहे.
P-8I Poseidon म्हणजे काय ?
• Boeing P-8I Poseidon हे दीर्घ पल्ल्याचे बहुउद्देशीय समुद्री गस्ती विमान (Maritime Patrol Aircraft) आहे.
• हे विमान मुख्यतः समुद्रातील शत्रूची हालचाल शोधणे आणि नौदलाला माहिती पुरवणे यासाठी वापरले जाते.
✍️ या विमानाच्या प्रमुख भूमिका:
• Anti-Submarine Warfare (ASW) — पाणबुड्यांचा शोध घेणे व त्यांच्यावर कारवाई
• Anti-Surface Warfare (ASuW) — समुद्रावरील जहाजांवर नजर ठेवणे
• Intelligence, Surveillance and Reconnaissance (ISR) — गुप्त माहिती व देखरेख
• Maritime Domain Awareness — समुद्री क्षेत्रातील हालचालींचे निरीक्षण
• Search and Rescue Operations — शोध व बचाव मोहिमा

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Boeing P-8I
• Boeing P-8I — समुद्री गस्ती विमान
• खरेदी प्रस्ताव — 6 अतिरिक्त विमाने
• मंजुरी — Defence Procurement Board (DPB)
• करार — भारत-अमेरिका Inter-Governmental Agreement (IGA)
• प्रक्रिया — Defence Acquisition Procedure (DAP) 2020



















