
चालू घडामोडी | नॅशनल हायवे ग्रीन कव्हर इंडेक्स

National Highways – Green Cover Index
📚 Subject : GS - निर्देशांक (Index), पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) -------- सोबत मिळून पहिला वार्षिक ‘नॅशनल हायवे ग्रीन कव्हर इंडेक्स प्रसिद्ध केला आहे.
1. नीति आयोग
2. पर्यावरण मंत्रालय
3. DRDO
4. ISRO
उत्तर : ISRO
📰 बातमी काय ?
• भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) ने ‘नॅशनल हायवे ग्रीन कव्हर इंडेक्स (NH-GCI) 2025–26’ हा पहिल्यांदाच (First-of-its-kind) वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला.
• हा अहवाल इस्त्रोच्या 'नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर' (National Remote Sensing Centre) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.
🧐 ग्रीन कव्हर इंडेक्स (GCI) म्हणजे काय ?
• ग्रीन कव्हर इंडेक्स म्हणजे राष्ट्रीय महामार्गांच्या आसपास किती प्रमाणात हरित आच्छादन (झाडे/वनस्पती) आहे हे मोजण्याची पद्धत.
• हा इंडेक्स प्रत्येक 1 किमीच्या भागात किती जमीन हिरव्या झाडांनी व्यापलेली आहे हे टक्केवारीत दाखवतो.
⚙️ ही मोजणी कशी केली जाते ?
👉 यासाठी उपग्रहातून (Satellite) मिळणाऱ्या डेटाचा वापर करून वनस्पतीतील क्लोरोफिल (Chlorophyll) मोजले जाते.
• Indian Space Research Organisation च्या Resourcesat-2/2A उपग्रहांमधून मिळणारा डेटा वापरून महामार्गाच्या दोन्ही बाजूंची हिरवाई मोजली जाते.
• यानंतर Cartosat उपग्रहांच्या अधिक अचूक चित्रांद्वारे ही माहिती तपासली (Cross-Check) जाते.
• ही सर्व माहिती NRSC च्या ‘Bhuvan’ पोर्टलवर नकाशांच्या स्वरूपात उपलब्ध केली जाते.

📊 प्रकल्पाचा व्याप (Coverage) :
• सध्या हा प्रकल्प सुमारे 30,000 किमी राष्ट्रीय महामार्गांवर लागू आहे.
• तो 24 राज्यांमध्ये चालू असून विशेषतः Operation & Maintenance (O&M) टप्प्यातील रस्त्यांवर लक्ष केंद्रित करतो.
🌱 धोरणाशी संबंध (Policy Linkage) :
• हा उपक्रम भारताच्या Green Highways Policy, 2015 शी थेट संबंधित आहे.
👉 या धोरणानुसार - फक्त झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यांचे जतन करणेही आवश्यक आहे
🚀 भविष्यातील सुधारणा (Future Scope) :
✍️ या प्रकल्पात भविष्यात पुढील तंत्रज्ञान वापरण्याची योजना आहे-
• मशीन लर्निंगद्वारे (Machine Learning) स्वयंचलित वर्गीकरण
• हिरवाई कमी झाल्यास त्वरित सूचना (Change Detection Alerts)
• कार्बन साठवण (Carbon Sequestration) मोजण्यासाठी मॉडेल
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• NH-GCI → पहिल्यांदाच वार्षिक अहवाल (2025–26)
• प्रसिद्ध → भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)
• सहकार्य → इस्त्रोच्या – NRSC
• मोजमाप → 1 किमी भागातील हिरवाई (% मध्ये)
• तंत्रज्ञान → Satellite data (Resourcesat, Cartosat)
• व्याप → 30,000 किमी, 24 राज्ये
• धोरण → Green Highways Policy 2015
• प्लॅटफॉर्म → Bhuvan Portal















