
चालू घडामोडी | प्रोजेक्ट HANUMAN

Project HANUMAN
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे, मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ‘प्रोजेक्ट HANUMAN’ कोणत्या राज्याने सुरू केला ?
1. आंध्र प्रदेश
2. कर्नाटक
3. महाराष्ट्र
4. ओडिशा
उत्तर : आंध्र प्रदेश
📰 बातमी काय ?
• आंध्र प्रदेश सरकारने ‘प्रोजेक्ट HANUMAN’ सुरू केला.
• या उपक्रमाचा उद्देश मानव–वन्यजीव संघर्ष (Human–Wildlife Conflict) कमी करणे हा आहे.

🧐 प्रोजेक्ट HANUMAN म्हणजे काय ?
• प्रोजेक्ट HANUMAN म्हणजे Healing and Nurturing Units for Monitoring, Aid and Nursing of Wildlife.
• आंध्र प्रदेश सरकारचा हा एक राज्यस्तरीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश वन्यजीवांचे बचाव (Rescue), उपचार (Treatment), पुनर्वसन (Rehabilitation) आणि निरीक्षण (Monitoring) करणे तसेच जंगलाजवळील लोकांचे संरक्षण करणे हा आहे.
⚙️ या प्रकल्पात नेमकं काय केलं जाणार आहे ?
1) वाहने - या प्रकल्पाअंतर्गत वन्यजीवांशी संबंधित घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी 100 वाहने तैनात केली जातील, ज्यामध्ये रॅपिड रिस्पॉन्स युनिट्स आणि वन्यजीव अॅम्ब्युलन्सचा समावेश आहे.
2) बचाव व उपचार केंद्रे - जखमी किंवा अडचणीत सापडलेल्या प्राण्यांसाठी विशाखापट्टणम, राजमहेंद्रवरम, तिरुपती आणि बिरलूट येथे बचाव व उपचार केंद्रे स्थापन केली जातील.
3) ‘वज्र’ टीम - गाव पातळीवर ‘वज्र’ (Vajra – Wildlife Rakshak) टीम तयार केल्या जातील, ज्या साप पकडणे किंवा लहान वन्यजीव घटनांवर नियंत्रण ठेवतील.
4) AI - याशिवाय, Artificial Intelligence (AI) चा वापर करून प्राण्यांची हालचाल ट्रॅक केली जाईल आणि ते गावाजवळ आल्यास आधीच सूचना दिली जाईल.
4) HANUMAN App - ‘HANUMAN App’ द्वारे लोकांना घटना नोंदवता येतील आणि प्रशासनाशी संपर्क साधता येईल.
💰 नुकसानभरपाई आणि विशेष उपाय :
• या प्रकल्पाअंतर्गत वन्यजीव हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्यास ₹10 लाख आणि जखमी झाल्यास ₹2 लाख नुकसानभरपाई दिली जाईल.
• पाळीव जनावरांच्या नुकसानीसाठी बाजारभावानुसार भरपाई दिली जाईल.
• तसेच, हत्तींच्या संघर्षप्रवण भागात प्रशिक्षित कुमकी हत्ती (Kumki Elephants) वापरून वन्य हत्तींचे कळप नियंत्रित केले जातील.
🤝 समन्वय (Coordination) :
या प्रकल्पात विविध विभाग एकत्र काम करणार आहेत —
• वन विभाग
• पोलिस
• कृषी विभाग
• महसूल विभाग
• पंचायत राज विभाग
🌍 HANUMAN प्रकल्प का महत्त्वाचा आहे ?
• हा उपक्रम दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य करतो -
1. जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांचे संरक्षण
2. जखमी किंवा भटक्या वन्यजीवांचे संरक्षण आणि पुनर्वसन
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : प्रोजेक्ट HANUMAN
• प्रोजेक्ट HANUMAN → आंध्र प्रदेश सरकारचा उपक्रम
• पूर्ण रूप → Healing and Nurturing Units for Monitoring, Aid and Nursing of Wildlife
• उद्देश → मानव–वन्यजीव संघर्ष कमी करणे
• ‘वज्र’ टीम → गाव पातळीवरील वन्यजीव रक्षक पथके
• तंत्रज्ञान → कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निरीक्षण + HANUMAN अॅप
• समन्वय → वन, पोलिस, कृषी, महसूल, पंचायत राज विभाग














