
चालू घडामोडी | जल महोत्सव 2026

Jal Mahotsav 2026
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘जल महोत्सव 2026’ हे अभियान कोणत्या योजनेअंतर्गत राबविले जाते ?
1. स्वच्छ भारत अभियान
2. नमामि गंगे अभियान
3. जल जीवन मिशन
4. अमृत योजना
उत्तर : जल जीवन मिशन
📰 बातमी काय ?
• जल शक्ती मंत्रालयाने गुजरात येथून जल महोत्सव 2026 अभियानाची सुरुवात 8 मार्च (आंतरराष्ट्रीय महिला दिन) रोजी केली.
• हा दिवस “सुजलाम शक्ती दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.

जल महोत्सव 2026 म्हणजे काय ?
• मंत्रालय - जल महोत्सव हा जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचा (Department of Drinking Water and Sanitation) एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो दरवर्षी 8 ते 22 मार्च दरम्यान साजरा केला जातो.
• मुख्य उद्देश - या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापनात लोकसहभाग वाढवणे आणि पाणी संवर्धनाला प्रोत्साहन देणे, विशेषतः जल जीवन मिशन अंतर्गत.
• घोषणा - "गावचा उत्सव, देशाचा महोत्सव" या घोषणेखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.
⚙️ या अभियानात नेमकं काय केलं जातं ?
• या अभियानाची सुरुवात “जल अर्पण दिवस” ने होते.
• या दिवशी गावातील पाणीपुरवठा यंत्रणा औपचारिकपणे ग्रामपंचायती आणि पाणी समित्यांकडे (VWSC) सोपवली जाते.
• यानंतर गावांमध्ये “जल बंधन” आणि “जल संकल्प” यांसारखे उपक्रम घेतले जातात.
👉 जल बंधन म्हणजे पाणी स्रोतांशी भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न
👉 जल संकल्प म्हणजे पाणी वाचवण्याची सामूहिक शपथ
• ग्रामपंचायत स्तरावर “जल चौपाल” आयोजित केली जाते, जिथे लोक पाण्याबाबत चर्चा करतात.
• शाळांमध्ये पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रात्यक्षिक (Water Testing) दाखवले जाते.
👩🔬 महिलांची भूमिका (Sujalam Shakti) :
• या अभियानात महिलांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.
• सुमारे 24 लाख महिला Field Testing Kits वापरून पाण्याची गुणवत्ता तपासत आहेत.
• महिला पंप ऑपरेटर, स्वयं सहाय्यता गट (SHG) आणि ग्राम जल समितीतील महिला प्रतिनिधी यांची भूमिका अधोरेखित केली जाते.
🌍 हा उपक्रम कसा राबवला जातो ?
हे अभियान चार स्तरांवर राबवला जातो :
1. राष्ट्रीय स्तर
2. राज्य स्तर
3. जिल्हा स्तर
4. ग्रामपंचायत स्तर
👉 यामुळे संपूर्ण देशभर एकसंध पद्धतीने काम केले जाते
🎯 व्यापक उद्देश (Vision) : ‘सुजल ग्राम’
• जल महोत्सवाचा उद्देश ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनात जनभागीदारी अधिक वाढवणे आणि ग्रामीण भारतात शाश्वत पाणी वापर तसेच ‘सुजल ग्राम’ निर्माण करण्यासाठी देशव्यापी जनचळवळ उभी करणे हा आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : जल महोत्सव
• जल महोत्सव → 8 ते 22 मार्च (वार्षिक अभियान)
• सुरुवात → 8 मार्च (महिला दिन) – सुजलाम शक्ती दिवस
• योजना → जल जीवन मिशन
• घोषणा → "गावचा उत्सव, देशाचा महोत्सव"
• फोकस →
1. पाणी व्यवस्थापनात जनभागीदारी अधिक वाढवणे
2. पाणी संवर्धनाला प्रोत्साहन देणे















