
चालू घडामोडी | ‘धर्म गार्डियन’ लष्करी सराव
JOINT EXERCISE 'DHARMA GUARDIAN'
Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म गार्डियन’ (Dharma Guardian) लष्करी सरावाबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
1. भारत – अमेरिका
2. भारत – जपान
3. भारत – ऑस्ट्रेलिया
4. भारत – फ्रान्स
उत्तर : भारत – जपान
📰 बातमी काय ?
• भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘धर्म गार्डियन’ (Dharma Guardian) चे 7वे संस्करण उत्तराखंडमधील चौबटिया येथे पार पडले.
• हा सराव भारतीय सेना आणि जपान ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्स (JGSDF) यांच्यात आयोजित केला जातो.

‘धर्म गार्डियन’ सरावाचा मुख्य उद्देश :
• ‘धर्म गार्डियन’ हा भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामधील समन्वय (Coordination) आणि एकत्रित काम करण्याची क्षमता वाढवणे हा आहे.
• 👉 हा सराव भारत आणि जपानमध्ये आलटून-पालटून (Alternately) आयोजित केला जातो
⚙️ या सरावात नेमकं काय केलं जातं ?
• या सरावात सैनिकांना अर्ध-शहरी भागात (Semi-Urban Area) ऑपरेशन कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.
• सैनिक प्रथम तात्पुरता बेस (Temporary Operating Base) तयार करतात आणि परिसराची माहिती गोळा करतात (ISR – Intelligence, Surveillance, Reconnaissance).
• यानंतर संशयित भागांमध्ये शोध मोहीम (Cordon and Search Operation) राबवली जाते आणि वाहन तपासणी (Check Posts) केली जाते.
• काही वेळा हेलिकॉप्टरद्वारे सैनिकांना उतरवून (Heliborne Operations) कारवाई केली जाते आणि घरांमध्ये घुसून कारवाई करण्याचे (House Intervention) प्रशिक्षण दिले जाते.
🎯 कोण सहभागी होते ?
• भारताकडून → लडाख स्काऊट्स (Ladakh Scouts)
• जपानकडून → 32वा इन्फंट्री रेजिमेंट (32nd Infantry Regiment)
🌍 हा सराव का महत्त्वाचा आहे ?
✍️हा सराव भारत-जपान संरक्षण सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
🤝 या सरावामुळे -
• दोन्ही देशांमधील विश्वास वाढतो
• आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिकता येतो
• संयुक्त कारवाई (Joint Operations) अधिक प्रभावी होते
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• धर्म गार्डियन → भारत – जपान संयुक्त लष्करी सराव
• 2026 → 7 वे संस्करण
• ठिकाण → चौबटिया, उत्तराखंड
• फोकस → अर्ध-शहरी भागात युद्ध प्रशिक्षण
















