
चालू घडामोडी | RBI कडून सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी
RBI injects ₹50,000 Crore into Banking System
Subject : GS - अर्थशास्त्र - बॅंकिंग
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मार्च 2026 मध्ये रिझर्व्ह बँकेने (RBI) अॅडव्हान्स टॅक्स भरण्यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये तरलता (Liquidity) वाढवण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला ?
1. रोख राखीव प्रमाण (Cash Reserve Ratio)
2. वैधानिक तरलता प्रमाण (Statutory Liquidity Ratio)
3. मुक्त बाजार व्यवहार (Open Market Operations)
4. बँक दर (Bank Rate)
उत्तर : मुक्त बाजार व्यवहार (Open Market Operations)
📰 बातमी काय ?
• Reserve Bank of India ने बँकिंग प्रणालीमध्ये तरलता वाढवण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचे OMO खरेदी (OMO Purchase) जाहीर केले.
• हे दोन टप्प्यांमध्ये (प्रत्येकी ₹50,000 कोटी) केले जाणार असून, अॅडव्हान्स टॅक्स भरण्यामुळे निर्माण होणारी तरलतेची (पैशांची) कमतरता (Liquidity Crunch) भरून काढणे हा उद्देश आहे.
🧐 OMO म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं ?
• मुक्त बाजार व्यवहार (Open Market Operations – OMO) हे चलनविषयक धोरणातील (Monetary Policy) एक महत्त्वाचे परिमाणात्मक साधन (Quantitative Tool) आहे.
👉 यात RBI सरकारी रोखे (Government Securities – G-Secs) खरेदी किंवा विक्री करून बाजारातील पैशांचा पुरवठा नियंत्रित करते
👉 कसं काम करतं ते समजून घ्या:
जर RBI बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करते, तर
→ बँकांना पैसे मिळतात
→ बँकिंग प्रणालीमध्ये तरलता (Liquidity) वाढते.
→ म्हणजे लोकांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे पैसा वाढतो.
• उदाहरणार्थ-
RBI ने ₹50,000 कोटींचे रोखे खरेदी केले, तर तेवढे पैसे बँकिंग प्रणालीमध्ये येतात
👉 उलट, जर RBI रोखे विकते, तर
→ बँकांकडून पैसे RBI कडे जातात
→ तरलता कमी होते
→ म्हणजे लोकांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे पैसा कमी शिल्लक राहतो.
👉 म्हणजेच
• रोखे खरेदी = पैसा वाढतो (Expansionary)
• रोखे विक्री = पैसा कमी होतो (Contractionary)
📊 RBI ने आत्ता OMO का वापरला ?
• मार्च महिन्यात कंपन्या अॅडव्हान्स टॅक्स भरतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा बँकिंग प्रणालीतून सरकारकडे जातो.
👉 अंदाजे 2 लाख कोटी रुपये बाजारातून बाहेर जातात.
यामुळे:
• बँकांकडे कर्ज देण्यासाठी पैसा कमी पडतो
• बाजारात तरलतेची कमतरता निर्माण होते
👉 म्हणून RBI आधीच OMO द्वारे पैसा बाजारात टाकते, जेणेकरून ही कमतरता भरून निघेल
⚙️ OMO चे प्रकार :
• OMO 2 प्रकारे केले जातात:
1) स्थायी व्यवहार (Outright OMO) -
• RBI कायमस्वरूपी रोखे खरेदी किंवा विक्री करते
• उदा. सध्याचे 1 लाख कोटी खरेदी
2) तात्पुरते व्यवहार (LAF – Liquidity Adjustment Facility)
• अल्प मुदतीच्या तरलता (पैसा) नियंत्रणासाठी Repo आणि Reverse Repo वापरले जातात.
🌍 मुक्त बाजार व्यवहार (Open Market Operations – OMO) का महत्त्वाचं आहे ?
OMO मुळे RBI ला व्याजदर न बदलता बाजारातील तरलता (पैसा) नियंत्रित करता येते.
यामुळे:
• महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवता येते
• आर्थिक वाढ (Growth) टिकवता येते
• बँकिंग प्रणाली स्थिर राहते
🔗 संबंधित संकल्पना :
✍️ Reserve Bank of India, मुक्त बाजार व्यवहार (OMO) व्यतिरिक्त CRR आणि SLR सारखी इतर साधनेही वापरते.
1) Cash Reserve Ratio (CRR) → बँकांना त्यांच्या एकूण ठेवींचा (NDTL) जो ठराविक हिस्सा रोख स्वरूपात RBI कडे ठेवावा लागतो, त्याला CRR म्हणतात.
2) Statutory Liquidity Ratio (SLR) → बँकांना त्यांच्या एकूण ठेवींचा (पैसे) जो हिस्सा तरल मालमत्तेच्या स्वरूपात स्वतःकडे ठेवावा लागतो, त्याला SLR म्हणतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• मुक्त बाजार व्यवहार → Open Market Operations (OMO)
• OMO → चलनविषयक धोरणाचे परिमाणात्मक साधन
• RBI → सरकारी रोखे खरेदी/विक्री करते
• सरकारी रोखे खरेदी → तरलता वाढते (Expansionary Policy)
• सरकारी रोखे विक्री → तरलता कमी होते (Contractionary Policy)





















