
चालू घडामोडी | वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामांतर

Government Medical College in Washim renamed
Subject : GS - सरकारी योजना/ उपक्रम - महाराष्ट्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
1. संत सेवालाल महाराज
2. संत गाडगेबाबा
3. संत तुकाराम महाराज
4. संत एकनाथ महाराज
उत्तर : संत सेवालाल महाराज
बातमी काय ?
• संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम’ असे करण्यास मान्यता दिली.
• यासंदर्भातील शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आला.
नामांतराचे महत्त्व -
• या नामांतरामुळे संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा प्रसार होऊन नवीन पिढीमध्ये सामाजिक मूल्यांची जाणीव वाढेल.
• तसेच वैद्यकीय शिक्षणाला सामाजिक व नैतिक मूल्यांची जोड मिळेल.

संत सेवालाल महाराज यांबद्दल थोडक्यात माहिती :
• संत सेवालाल महाराज हे गोर-बंजारा समुदायाचे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक आणि आधुनिक संत होते.
• त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला नैतिकता, परिश्रम आणि स्वाभिमानाचे मूल्य दिले.
• त्यांचे विचार विशेषतः वंचित व भटक्या समाजासाठी जागृती आणि संघटन निर्माण करणारे होते.
जन्म :
• त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील गोलार दोडी तांडा येथे बंजारा समाजातील भीमा नाईक आणि धरमणी या पशुपालक दांपत्यापोटी झाला.
• गोलार दोडी तांडा हे सेवालाल महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे, ते सेवागड या नावानेही ओळखले जाते.
कार्य :
• महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात राहणारा बंजारा समाज, त्यांची भाषा, अस्मिता इ.च्या हक्कांसाठी सेवालाल महाराजांनी आपले आयुष्य वेचले.
• त्यांनी 18 व्या शतकातील म्हैसूरचे शासक आणि ब्रिटिश शासक यांच्याविरुद्ध लढा दिला.
• त्या काळात बंजारांना सुरक्षा आणि आशा देणारे ते पहिले नेते होते.
📖 संत सेवालाल महाराजांचे विचार व शिकवण :
1) शिक्षण व प्रगती :
• “शिकायचे, शिकवायचे, शिकून राज्य घडवायचे”
2) सामाजिक समता व मानवता :
• स्त्रियांचा सन्मान करा — मुलगा-मुलगी भेद करू नका
• माणुसकीवर प्रेम करा
• कुटुंब व समाजातील बंधुभाव टिकवा
3) नैतिक मूल्ये :
• खोटे बोलू नका
• प्रामाणिक आणि सदाचारपूर्ण जीवन जगा
• वडीलधाऱ्यांचा आदर करा
4) व्यसनमुक्ती व शिस्त :
• कोणतेही व्यसन करू नका
• आत्मसंयम आणि शिस्तबद्ध जीवन जगावे
5) तर्कशीलता व अंधश्रद्धा निर्मूलन :
• अंधश्रद्धेला थारा देऊ नका
• तर्क व तथ्यांच्या आधारे जीवन जगावे
6) धैर्य व स्वाभिमान :
• संकटांना निर्भयपणे सामोरे जा
• सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवन जगा
7) समाजसेवा :
• गरजूंना अन्न, पाणी द्या व त्यांना मदत करा
• समाजासाठी कार्य करणे हीच खरी सेवा
8) पर्यावरण व प्राणी संरक्षण
• जंगल व पर्यावरणाचे रक्षण करा
• प्राण्यांवर दया करा, बळी देऊ नका
• निसर्ग नष्ट करणे म्हणजे स्वतःचे नुकसान
मृत्यू आणि समाधीस्थळ :
• सेवालाल महाराज यांचे निधन 4 डिसेंबर 1806 रोजी श्रीक्षेत्र रुईगड, जि. यवतमाळ येथे झाले.
• वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (पोहरागड) येथे त्यांची समाधी आजही देवी जगदंबेच्या मंदिराला लागून आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : संत सेवालाल महाराज
• नामकरण — नामकरण ‘संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम’
• शासन निर्णय — 13 फेब्रुवारी 2026
• संत सेवालाल महाराज — बंजारा समाजाचे आराध्य दैवत
• जन्म : 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील गोलार दोडी तांडा
• मृत्यू : 4 डिसेंबर 1806
• समाधीस्थळ : वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी
• मुख्य विचार — समता, व्यसनमुक्ती, परिश्रम, स्वाभिमान


















