
चालू घडामोडी | 'महा वॉटर मिशन'
MAHA Water Mission
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या 'महा वॉटर मिशन' (MAHA Water Mission) चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?
- देशातील नद्या एकमेकांना जोडणे
- प्रयोगशाळेतील पाण्याचे प्रगत संशोधन प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून भारताची दीर्घकालीन जलसुरक्षा मजबूत करणे
- सर्व नागरिकांना शुद्ध पाण्याचे जार मोफत पुरवणे
- समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी नवीन कारखाने उभारणे
उत्तर : प्रयोगशाळेतील पाण्याचे प्रगत संशोधन प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून भारताची दीर्घकालीन जलसुरक्षा मजबूत करणे.
📰 बातमी काय ?
• जल क्षेत्रातील प्रगत मोहीम: अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालय (MoJS) यांनी संयुक्तपणे 'महा वॉटर मिशन' ची अधिकृत सुरुवात केली आहे.
🧐 'महा वॉटर मिशन' काय आहे ?
• 'MAHA वॉटर मिशन' पूर्ण नाव - Missions for Advancement in High-Impact Areas
• या मोहिमेचा मुख्य हेतू प्रयोगशाळेतील संशोधनापासून ते थेट जमिनीवरील अंमलबजावणीपर्यंतच्या पाणी व्यवस्थापनातील नवनवीन प्रयोगांना गती देणे आणि भारताची दीर्घकालीन जल सुरक्षा मजबूत करणे हा आहे.
• देशातील जल क्षेत्रातील स्टार्ट-अप्स, लघु व मध्यम उद्योग (MSMEs), विद्यापीठे आणि संशोधकांना थेट निधी उपलब्ध करून देणे हे 'MAHA वॉटर मिशन' चे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
• संयुक्त पुढाकार - हे मिशन भारत सरकारच्या 'अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन' (ANRF) आणि 'केंद्रीय जलशक्ती मंत्रालय' (Ministry of Jal Shakti) यांचा एक संयुक्त पथदर्शी प्रकल्प आहे.
🧐 'महा वॉटर मिशन' 5 प्रमुख प्राधान्य क्षेत्रे (Objectives & Focus Areas) :
या मिशन अंतर्गत संशोधनासाठी खालील 5 प्रमुख विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल -
1) जलस्रोत मूल्यांकन आणि शाश्वत व्यवस्थापन → पाण्याचे साठे मोजणे आणि त्यांचे योग्य नियोजन करणे.
2) पिण्याचे पाणी (Drinking Water) → सर्वांना सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणे.
3) पाण्याचा दर्जा आणि पर्यावरणीय आरोग्य → जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवून जल परिसंस्थेचे रक्षण करणे.
4) पाणी वापर कार्यक्षमता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था (Circular Economy) → पाण्याचा अपव्यय टाळणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर वाढवणे.
5) हवामान लवचिकता आणि अनुकूलन (Climate Resilience) → हवामान बदलांमुळे निर्माण होणाऱ्या जलसंकटाचा सामना करण्याची क्षमता विकसित करणे.

💰🛰️ वित्तीय तरतूद आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर :
1) निधी आणि साहाय्य - या मिशनसाठी पुढील 5 वर्षांकरिता एकूण 200 कोटी रुपयांचा एकत्रित निधी मंजूर करण्यात आला आहे. तंत्रज्ञान विकास, क्षेत्रीय पडताळणी आणि मोठ्या प्रमाणावरील अंमलबजावणीसाठी निवडलेल्या प्रत्येक समूहाला (Consortium) 20 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
2) आंतर-क्षेत्रीय सहकार्य (Collaborative Framework) - या मोहिमेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), अंतराळ विभाग, CSIR च्या प्रयोगशाळा आणि पृथ्वी विज्ञान संस्था यांची महत्त्वपूर्ण भागीदारी असेल.
3) सॅटेलाइट डेटाचा वापर - जलस्रोतांचे अचूक नकाशे तयार करणे, शेतीच्या सिंचनाचे नियोजन आणि भूजल पातळीचे (Groundwater) मूल्यांकन करण्यासाठी इस्रोच्या उपग्रह (Satellite) आणि जिओस्पेशिअल डेटाचा प्रभावी वापर केला जाईल.
4) व्यावसायिक यश (Significance) - हे मिशन भारताच्या व्यापक संशोधन, विकास आणि नवकल्पना (RDI) चौकटीशी सुसंगत आहे, ज्यामुळे नवीन जल-तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण (Commercialization) करणे आणि स्थानिक समुदायांना पाण्याचे शाश्वत उपाय देणे सुलभ होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीन IMP रिव्हिजन पॉईंट्स : MAHA Water Mission
• 'MAHA' चा फुल फॉर्म → Missions for Advancement in High-Impact Areas.
• मिशन सुरू करणाऱ्या संस्था → ANRF आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालय
• पुढील 5 वर्षांसाठी एकूण बजेट → ₹ 200 कोटी
• मॅपिंगसाठी तांत्रिक भागीदार संस्था → इस्रो (ISRO)



















