
चालू घडामोडी | भारतीय पासपोर्ट आणि नागरिकत्वाची कायदेशीर रचना

Legal Framework of Indian Passport and Citizenship
📚 Subject : GS - राज्यशास्त्र - नागरिकत्व
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अलीकडेच दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, 'भारतीय पासपोर्ट' (Indian Passport) हे प्रामुख्याने खालीलपैकी काय मानले जाते ?
अ) नागरिकत्वाचा अंतिम आणि परिपूर्ण पुरावा
ब) आंतरराष्ट्रीय प्रवासाचा दस्तऐवज (Travel Document)
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
4. अ आणि ब दोन्ही चूक आहेत
उत्तर : आंतरराष्ट्रीय प्रवासाचा दस्तऐवज (Travel Document)
📰 बातमी काय ?
• परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केले आहे की, भारतीय पासपोर्ट हे मुख्यतः एक आंतरराष्ट्रीय 'प्रवास दस्तऐवज' (Travel Document) असून ते भारतीय नागरिकत्वाचा अंतिम किंवा परिपूर्ण पुरावा (Conclusive Proof of Citizenship) म्हणून मानले जाऊ शकत नाही.
🧐 भारतीय पासपोर्ट आणि इ-पासपोर्ट (ePassport) काय असतं ?
1) जारी करणारी संस्था -
• भारतीय पासपोर्ट हे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे (MEA) जारी केले जाणारे अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रवास दस्तऐवज आहे. हे परदेशात प्रवास करताना व्यक्तीची ओळख आणि राष्ट्रीयत्व सिद्ध करते.
2) ई-पासपोर्ट (ePassport) -
• हा कागदी आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा एकत्रित पासपोर्ट असतो, ज्यामध्ये 'रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन' (RFID) चिप आणि अँटेना बसवलेला असतो. यात पासपोर्टधारकाची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती साठवलेली असते.
• हे तंत्रज्ञान 'आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या' (ICAO) मानकांनुसार बनवले जाते.

🤔 भारतीय नागरिकत्व (Citizenship) आणि मिळवण्याचे मार्ग :
1) घटनात्मक स्थान -
• नागरिकत्व हा विषय संविधानाच्या 'संघसूची' (Union List) मध्ये येतो. त्यामुळे यावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे.
2) भाग आणि कलमे -
• भारतीय संविधानात 'नागरिक' या शब्दाची थेट व्याख्या दिलेली नाही, परंतु भाग 2 मधील कलम 5 ते 11 दरम्यान नागरिकत्वाबाबतच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत.
3) नागरिकत्व कायदा 1955 (Citizenship Act, 1955) -
या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग आहेत :
1 - जन्माने (By Birth)
2 - वंशपरंपरेने (By Descent)
3 - नोंदणीद्वारे (By Registration)
4 - स्वीकृतीद्वारे (By Naturalisation)
5 - प्रदेश विलीनीकरणाद्वारे (By Incorporation of Territory)
🤔 संकल्पना - स्वीकृतीद्वारे (By Naturalisation) म्हणजे काय ?
• "एखाद्या परदेशी नागरिकाने सर्व अटी पूर्ण करून भारत सरकारकडे अर्ज करणे आणि सरकारने त्याला भारताचा नागरिक म्हणून 'स्वीकारणे' ."
✍️ दुहेरी नागरिकत्वास बंदी :
• भारतात दुहेरी नागरिकत्वाला (Dual Citizenship) परवानगी नाही.
• जर एखाद्या भारतीय नागरिकाने दुसऱ्या देशाचा पासपोर्ट किंवा नागरिकत्व स्वीकारले, तर त्याला त्याचा भारतीय पासपोर्ट तात्काळ सरेंडर करावा लागतो.
🤔 नागरिकत्व संपुष्टात येण्याचे 3 मार्ग
1) त्याग (Renunciation) : जेव्हा एखादी व्यक्ती स्वेच्छेने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते.
2) समाप्ती (Termination) : जेव्हा एखादा भारतीय नागरिक स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारतो, तेव्हा त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते.
3) वंचित ठेवणे (Deprivation) : केंद्र सरकार खालील कारणांवरून एखाद्याचे नागरिकत्व रद्द करू शकते:
ㅤㅤ• फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असल्यास.
ㅤㅤ• संविधानाशी अनादर दाखवला असल्यास.
ㅤㅤ• युद्धाच्या काळात शत्रू देशाला बेकायदेशीर मदत केली असल्यास.
ㅤㅤ• देशीयीकरणानंतर 5 वर्षांच्या आत 2 वर्षांची कारावासाची शिक्षा झाली असल्यास.
ㅤㅤ• सलग 7 वर्षे भारताबाहेर सामान्य रहिवासी म्हणून राहिल्यास.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भारतीय पासपोर्ट काय आहे ? → एक आंतरराष्ट्रीय 'प्रवास दस्तऐवज'
• पासपोर्ट काय नाही ? → भारतीय नागरिकत्वाचा परिपूर्ण पुरावा नाही.
• पासपोर्ट जारी करणारे मंत्रालय → परराष्ट्र मंत्रालय
• भारतीय नागरिकत्व संविधानातील स्थान → भाग 2, कलम 5 ते 11
• यादी → संघसूची (Union List)
• नागरिकत्वासाठी कायदे करण्याचा अधिकार → संसदेला (केंद्राला)
• भारतीय नागरिकत्व → एकेरी नागरिकत्व

























