
चालू घडामोडी | स्कॉटलंडमध्ये महर्षी सुश्रुत यांच्या कांस्यपुतळ्याचे अनावरण
Maharishi Sushruta Statue Unveiled in Edinburgh
📚 Subject : GS - इतिहास - प्राचीन भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जगातील सर्वांत जुन्या वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या स्कॉटलंडमधील 'द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग' येथे 'प्लास्टिक सर्जरीचे जनक' मानल्या जाणाऱ्या कोणत्या प्राचीन भारतीय वैद्याच्या कांस्यपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?
1 - महर्षी चरक
2 - महर्षी सुश्रुत
3 - ऋषी वाग्भट
4 - धन्वंतरी
उत्तर : महर्षी सुश्रुत
📰 बातमी काय ?
• स्कॉटलंडमधील 'द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग' (Royal College of Surgeons of Edinburgh) या जगातील सर्वात जुन्या वैद्यकीय संस्थांपैकी एका संस्थेने महर्षी सुश्रुत यांच्या कांस्यपुतळ्याचे (Bronze Statue) अनावरण करून भारताच्या प्राचीन शल्यचिकित्सेतील योगदानाचा गौरव केला आहे.

🧐 महर्षी सुश्रुत आणि पुतळ्याची वैशिष्ट्ये :
1) मूर्तीची निर्मिती - महर्षी सुश्रुत यांचा हा कांस्यपुतळा तमिळनाडूतील 'स्वामीमलाई' (Swamimalai) येथे पारंपरिक 'लॉस्ट-व्हॅक्स पद्धत' (Lost-Wax Method) आणि सिंगल ब्रॉन्झ कास्टिंग तंत्राचा वापर करून तयार करण्यात आला आहे.
2) संस्थेची माहिती - स्कॉटलंडमधील या रॉयल कॉलेजची स्थापना 1505 मध्ये राजा जेम्स चौथा (King James IV) याने केली होती.


📚📚 संदर्भ - प्राचीन भारताचा इतिहास
📜 महर्षी सुश्रुत यांची पार्श्वभूमी :
• महर्षी सुश्रुत हे इसवी सन पूर्व 7 व्या ते 6 व्या शतकातील (7th-6th Century BCE) प्राचीन भारतातील प्रसिद्ध वैद्य आणि शल्यचिकित्सक होते.
• त्यांचा संबंध प्रामुख्याने वाराणसीशी (काशी) जोडला जातो.
⛳️ जनक -
• महर्षी सुश्रुत यांना शल्यचिकित्सेतील आद्य योगदानासाठी 'शल्यचिकित्सेचे जनक' (Father of Surgery) आणि 'प्लास्टिक सर्जरीचे जनक' (Father of Plastic Surgery) म्हणून जगभरात ओळखले जाते.
• पारंपरिक कथांनुसार ते धन्वंतरींचे शिष्य मानले जातात.
🤔 'सुश्रुत संहिता' आणि वैद्यकीय योगदान :
1) ग्रंथ - महर्षी सुश्रुत यांनी 'सुश्रुत संहिता' (Sushruta Samhita) हा ग्रंथ लिहिला, जो शल्यचिकित्सा आणि प्लास्टिक सर्जरीवरील जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथांपैकी एक आहे.
2) आयुर्वेदाची 'बृहत त्रयी' (Great Trilogy) - आयुर्वेदातील तीन मुख्य ग्रंथांमध्ये सुश्रुत संहितेचा समावेश होतो (चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय).
3) 300 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया - महर्षी सुश्रुत यांनी 300 पेक्षा जास्त प्रकारच्या शस्त्रक्रियांचे वर्णन आणि प्रात्यक्षिक केले आहे.
उदाहरणार्थ -
• रायनोप्लास्टी (Rhinoplasty): कापा गेलेल्या नाकाची पुनर्निर्मिती करणे.
• मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Removal)
• सिझरियन डिलिव्हरी (Caesarean Delivery)
• ओष्ठ सांधणे व कर्ण सांधणे (Lobuloplasty and Otoplasty): कान व ओठ यांच्यावर प्लास्टिक सर्जरी.
✍️ प्रात्यक्षिक प्रशिक्षण व तत्त्वे -
• मानवी शरीरावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सुप्रशिक्षित होण्यासाठी त्यांनी प्राण्यांच्या मृतदेहांचा आणि निर्जीव वस्तूंचा (उदा. टरबूज, काकडी) वापर करून सराव करण्याची पद्धत सुरू केली.
• तसेच त्यांनी भूल देणे (Anaesthesia-Like Practices) आणि स्वच्छता राखण्यावर भर दिला.
📚 आयुर्वेदाची 'बृहत त्रयी' म्हणजे काय ?
• आयुर्वेदाच्या प्राचीन आणि मूलभूत वैद्यकीय ज्ञानाचा पाया रचणाऱ्या तीन मुख्य व अत्यंत श्रेष्ठ ग्रंथांच्या समूहाला आयुर्वेदात 'बृहत त्रयी' (Great Trilogy) असे म्हटले जाते.
• 'बृहत' म्हणजे 'महान किंवा मोठे' आणि 'त्रयी' म्हणजे 'तीनाचा समूह'. हे तीनही ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेले असून प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राचा प्रामाणिक दस्तऐवज मानले जातात.
📚 'बृहत त्रयी' मधील 3 मुख्य ग्रंथ, लेखक आणि त्यांची वैशिष्ट्ये :
1) चरक संहिता (लेखक: महर्षी चरक) :
• मुख्य विषय - कायचिकित्सा (Internal Medicine) आणि औषधशास्त्र.
• वैशिष्ट्ये - यामध्ये विविध रोगांची लक्षणे, त्यांचे निदान आणि वनस्पतींपासून बनवलेल्या औषधांच्या उपचारांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. या ग्रंथाला भारतीय वैद्यकशास्त्राचा पाया मानले जाते.
2) सुश्रुत संहिता (लेखक: महर्षी सुश्रुत) :
• मुख्य विषय - शल्यचिकित्सा (Surgery) आणि प्लास्टिक सर्जरी.
• वैशिष्ट्ये - यामध्ये मानवी शरीराची रचना (Anatomy), निरनिराळ्या शस्त्रक्रिया (उदा. रायनोप्लास्टी, मोतीबिंदू) आणि शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे सविस्तर वर्णन केले आहे.
3) अष्टांग हृदय (लेखक: ऋषी वाग्भट) :
• मुख्य विषय - आयुर्वेदाची 8 मुख्य अंगे (सर्वसमावेशक अष्टांग आयुर्वेद)
• वैशिष्ट्ये - चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोन्ही ग्रंथांमधील कठीण व क्लिष्ट तत्त्वे एकत्र करून अत्यंत सोप्या आणि काव्यमय श्लोक स्वरूपात या ग्रंथात मांडण्यात आली आहेत.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : महर्षी सुश्रुत
• महर्षी सुश्रुत → इ.स.पू. 7 व्या ते 6 व्या शतकातील प्रसिद्ध वैद्य आणि शल्यचिकित्सक
• पुतळ्याचे अनावरण ठिकाण → रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग (स्कॉटलंड)
• महर्षी सुश्रुत → शल्यचिकित्सा व प्लास्टिक सर्जरीचे जनक
• मुख्य ग्रंथ → सुश्रुत संहिता (Sushruta Samhita)























