
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026
International Yoga Day 2026
📚 Subject : GS - दिनविशेष, कला आणि संस्कृती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 21 जून 2026 रोजी जगभरात साजरा करण्यात आलेल्या '12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची' अधिकृत मुख्य संकल्पना खालीलपैकी कोणती आहे ?
1. योगा आणि पर्यावरण (Yoga and Environment)
2. निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing)
3. आरोग्यासाठी योग (Yoga for Health)
4. जागतिक शांततेसाठी योग (Yoga for World Peace)
उत्तर : निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing)
📰बातमी काय ?
• दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो.
• यंदाचा हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.
🧐 आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• “निरोगी वृद्धत्वासाठी योग” (Yoga for Healthy Ageing) ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे.

🧐 दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरी करतात ?
• जगभरातील लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, योगा बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.
🧐 आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनलाच का साजरी करतात ?
• 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो.
• योग आणि अध्यात्मा साठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.
• या दिवसाला ग्रीष्म संक्रांती असेही म्हणतात.
• यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला साजरी करतात.
✍️ पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरी केला ?
• 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरी केला.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभे मध्ये (UNGA) आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल प्रस्ताव मांडला.
• या प्रस्तावास संयुक्त राष्ट्र महासभेने ११ डिसेंबर 2014 रोजी मान्यता दिली आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.
⛳️ युनेस्को च्या अमृत सांस्कृतिक वारसा :
• 2016 मध्ये योगाला मानवताच्या युनेस्को च्या अमृत सांस्कृतिक वारसाच्या (UNESCO - Intangible Cultural Heritage of Humanity) यादी मध्ये समावेश करण्यात आले.
🤔 योगाचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?
• महर्षी पतंजली यांना योगाचे पितामहा म्हणून ओळखले जाते.
• महर्षी पतंजली हे एक प्राचीन भारतीय ऋषी आणि तत्वज्ञानी होते.
• त्यांनी योग सूत्रांचे लेखन केले यात त्यांनी योगाची नैतिक मार्गदर्शक तत्त्वे, ध्यान तंत्रे आणि आध्यात्मिक उद्दिष्टांसह तत्त्वे आणि पद्धतींची रूपरेषा सांगितली आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : International Yoga Day
• आंतरराष्ट्रीय योग दिवस → 21 जून
• वर्ष 2026 ची आवृत्ती → 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस.
• वर्ष 2026 ची संकल्पना (Theme) → “निरोगी वृद्धत्वासाठी योग” (Yoga for Healthy Ageing)
• 21 जून चे भौगोलिक वैशिष्ट्य → उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस
• पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस → 21 जून 2015
• युनेस्को (UNESCO) मान्यता → वर्ष 2016 मध्ये 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' यादीत समावेश
• योगाचे पितामह → महर्षी पतंजली ('योग सूत्र' ग्रंथाचे लेखक)
























