
चालू घडामोडी | महाराष्ट्र सरकारची 'उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी
High Energy Medical Cyclotron Project (HEMCP) in Maharashtra
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने वर्ष 2026 मध्ये 300 कोटी रुपयांच्या मंजुरीसह 'उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्प' (HEMCP) खालीलपैकी कोणत्या शहरात उभारण्यास मान्यता दिली आहे ?
1. पुणे
2. नागपूर
3. छत्रपती संभाजीनगर
4. मुंबई
उत्तर : नागपूर
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूर येथे 300 कोटी रुपयांच्या निधी वाटपासह 'उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पाच्या' (High Energy Medical Cyclotron Project - HEMCP) स्थापनेला मंजुरी दिली आहे.

🧐 वैद्यकीय सायक्लोट्रॉन (Medical Cyclotron) म्हणजे नक्की काय ?
• वैद्यकीय सायक्लोट्रॉन हा एक प्रकारचा विशिष्ट 'कण त्वरक' (Particle Accelerator) म्हणजेच अशी मशीन आहे, जी आरोग्य सेवेमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'रेडिओआयसोटोप्स' (Radioisotopes - रेडिओधर्मी समस्थानिके) ची निर्मिती करते.
⚛️ कार्यपद्धती —
• ही यंत्रणा विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांचा (Electric and Magnetic Fields) वापर करून प्रोटॅानसारख्या (Protons) प्रभारित कणांना अतिशय उच्च गती देते.
• हे हाय-स्पीड कण नंतर एका विशिष्ट लक्ष्यावर (Target Material) आदळतात, ज्यामुळे न्यूक्लियर रिॲक्शन (Nuclear Reaction) घडून येते आणि रेडिओआयसोटोप्स (रेडिओधर्मी समस्थानिके) तयार होतात.
🤔 या सायक्लोट्रॉन प्रकल्पाचे आरोग्य क्षेत्रात काय महत्त्व आहे ?
1) कर्करोग (Cancer) निदान व उपचार — या सायक्लोट्रॉनद्वारे तयार होणारे रेडिओआयसोटोप्स प्रामुख्याने कॅन्सरच्या निदानासाठी आणि उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
2) प्रगत इमेजिंग (Advanced Imaging) — याद्वारे उत्पादित रेडिओधर्मी पदार्थ हे PET (Positron Emission Tomography) स्कॅन आणि PET-CT इमेजिंग मध्ये वापरले जातात, ज्यामुळे शरीरातील ट्यूमर किंवा अंतर्गत आजारांची अचूक माहिती मिळते.
3) टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy) — या कणांचा वापर करून कर्करोगाच्या पेशींवर थेट मारा करणाऱ्या 'टार्गेटेड रेडिओन्यूक्लाइड थेरपी' (Targeted Radionuclide Therapies) राबवल्या जातात.
🧐 प्रमुख रेडिओआयसोटोप्स (रेडिओधर्मी समस्थानिके) कोणते ?
• वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे फ्लोरिन-18 (F-18), गॅलियम-68 (Ga-68) आणि ल्युटेशियम-177 (Lu-177) हे काही प्रमुख वैद्यकीय रेडिओआयसोटोप्स आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : HEMCP नागपूर
• प्रकल्पाचे नाव → उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्प (HEMCP)
• मंजूर ठिकाण → नागपूर
• निधी वाटप → 300 कोटी रुपये
• सायक्लोट्रॉनचे स्वरूप → कण त्वरक (Particle Accelerator)
• मुख्य उपयोग → PET स्कॅन, कॅन्सर निदान व उपचार थेरपी
• वैद्यकीय रेडिओआयसोटोप्स उदाहरणे → Fluorine-18 (F-18), Gallium-68 (Ga-68), Lutetium-177 (Lu-177)



























