
चालू घडामोडी | जागतिक मगर दिन
World Crocodile Day
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक मगर दिन केव्हा साजरी केला जातो ?
- 5 जून
- 9 जून
- 17 जून
- 21 जून
उत्तर : 17 जून
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 17 जून रोजी जागतिक मगर दिन साजरा केला जातो.
• भारताने 1975 मध्ये मगर संवर्धन कार्यक्रम सुरू केला आणि 2026 मध्ये या यशस्वी उपक्रमाला 51 वर्षे पूर्ण होत आहे.
• भारतात, "मगर संवर्धन प्रकल्प" (Crocodile Conservation Project) 1975 मध्ये सुरू करण्यात आला, ज्यामुळे ओडिशातील भितरकणिका सारख्या भागात त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

🐊🐊 जागतिक मगर दिन का साजरी करतात ?
• मगर ही पाणी आणि जमिनीचे पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते.
• ते अनेक नद्या आणि दलदलीच्या प्रदेशांच्या परिसंस्थेतील सर्वोच्च भक्षक आहेत.
• जर मगरी नामशेष झाल्या तर अन्नसाखळीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
• मगरींची घटती संख्या, शिकार आणि त्यांच्या अधिवासाचा नाश याविरुद्ध जागतिक जागरूकता पसरविण्यासाठी
• मगरी आणि त्यांच्यासारख्या इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 17 जून रोजी जागतिक मगर दिन साजरा केला जातो.
🐊 भारतातील मगरीच्या 3 प्रमुख प्रजाती कोणत्या ?
• घरियाल (Gavialis Gangeticus)
• खाऱ्या पाण्यातील मगर (Crocodylus Porosus)
• दलदलीच्या प्रदेशातील मगर (Crocodylus Palustris)
• ओडिशा हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे मगरीच्या या तीनही प्रजाती आढळतात.

🤔 जागतिक मगर दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• "Legacy in Every Scale" ही जागतिक मगर दिन 2026 ची अधिकृत संकल्पना (Theme) आहे.
मगरींचे पृथ्वीवरील 20 कोटी वर्षांपेक्षा जास्त काळाचे अस्तित्व आणि त्यांचा उत्क्रांतीचा वारसा हायलाइट करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Crocodile Day
• जागतिक मगर दिन → 17 जून
• 2026 संकल्पना (Theme) → "Legacy in Every Scale"
• भारताचा मगर संवर्धन प्रकल्प → 1975 मध्ये सुरू
• मगरींच्या प्रजातींचे वर्गीकरण → भारतात प्रामुख्याने 3 प्रजाती आढळतात:
ㅤㅤㅤ➤ घरियाल (Gavialis Gangeticus)
ㅤㅤㅤ➤ खाऱ्या पाण्यातील मगर (Crocodylus Porosus)
ㅤㅤㅤ➤ दलदलीच्या प्रदेशातील मगर (Crocodylus Palustris)
• ओडिशा हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे मगरीच्या या तीनही प्रजाती आढळतात.






















