
चालू घडामोडी | 'तेजस मार्क-1A'
Tejas Mk1A
📚 Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान 'तेजस' (LCA Tejas) प्रामुख्याने भारतीय वायू सेनेतील (IAF) कोणत्या जुन्या व निवृत्त होणाऱ्या लढाऊ विमानांची जागा घेणार आहे ?
- सुखोई-30 (Sukhoi-30)
- मिराज-2000 (Mirage 2000)
- मिग- 21 (MiG-21)
- राफेल (Rafale)
उत्तर : मिग- 21 (MiG-21)
📰 बातमी काय ?
• केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' (HAL) च्या चालू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला असून, यामध्ये 'तेजस मार्क-1A' (Tejas Mk1A) या हलक्या लढाऊ विमानांच्या (LCA) वितरणातील विलंबावर चर्चा करण्यात आली आहे.
✍️ संरक्षण करार :
• भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायू सेनेसाठी (IAF) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून 97 तेजस मार्क-1A (Tejas Mk1A) विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे.
🤔 'तेजस' कोणाची जागा घेणार आहे ?
• MiG-21 ची जागा घेणार - 'तेजस' या नवीन विमानांची खरेदी हवाई दलातील जुन्या झालेल्या आणि लवकरच टप्प्याटप्प्याने बाहेर पडणाऱ्या MiG-21 लढाऊ विमानांच्या ताफ्याची जागा घेण्यासाठी केली जात आहे.
🤝 हवाई दलाची तातडीची गरज -
• भारतीय हवाई दलाची मंजूर संख्या 42.5 लढाऊ स्क्वाड्रन्सची (Fighter Squadrons) असताना सध्या प्रत्यक्षात केवळ 29 स्क्वाड्रन्स उपलब्ध आहेत.
• त्यामुळे हवाई दलाची युद्धक्षमता टिकवण्यासाठी तेजस Mk1A चा तातडीने समावेश करणे ही एक अत्यंत महत्त्वाची लष्करी गरज बनली आहे.
🧐 'तेजस Mk-1A' ची तांत्रिक वैशिष्ट्ये (Technical Specifications)
'तेजस' हे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण असून त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
1) जगातील सर्वात हलके लढाऊ विमान - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने विकसित केलेले 'तेजस' हे आपल्या वर्गातील जगातील सर्वात हलके लढाऊ विमान (World’s lightest fighter aircraft) आहे.
2) पिढी (Generation): हे अत्यंत आधुनिक अशा 4.5 जनरेशन (4.5 generation) चे, सर्व प्रकारच्या हवामानात लढू शकणारे बहु-भूमिका (Multi-role) लढाऊ विमान आहे.
3) विविध भूमिका - हे विमान शत्रूवर आक्रमक हवाई हल्ला करणे (Offensive air support), हवेतील समोरासमोरील लढाई (Close combat) आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करणे (Ground attack) या सर्व भूमिका सहज पार पाडू शकते.
4) सर्वात प्रगत आवृत्ती - 'LCA Mk1A' ही आतापर्यंतच्या तेजस विमानांची सर्वात प्रगत आणि अद्ययावत आवृत्ती आहे.
🚀विमानातील अत्याधुनिक प्रणाली व उपकरणे (Advanced Features) :
तेजस Mk1A विमानाला शत्रूवर मात करण्यासाठी खालील आधुनिक इलेक्ट्रॉनिक आणि रडार यंत्रणांनी सुसज्ज करण्यात आले आहे:
1) AESA रडार (Active Electronically Scanned Array) → शत्रूची विमाने आणि लक्ष्यांचा अचूक माग घेण्यासाठी प्रगत रडार यंत्रणा.
2) इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW Suite) → यामध्ये रडार वॉर्निंग आणि स्वतःचे रक्षण करणारी जॅमिंग (Self-protection jamming) प्रणाली समाविष्ट आहे.
3) डिजिटल मॅप जनरेटर (DMG) → वैमानिकाला युद्धादरम्यान अचूक भौगोलिक दिशा आणि नकाशा दाखवण्यासाठी.
4) स्मार्ट मल्टी-फंक्शन डिस्प्ले (SMFD) → कॉकपिटमधील प्रगत आणि सुलभ डिजिटल स्क्रीन यंत्रणा.
5) कम्बाइंड इंटर्रोगेटर अँड ट्रान्सपॉन्डर (CIT) → शत्रूचे आणि मित्राचे विमान ओळखणारी तांत्रिक प्रणाली आणि प्रगत रेडिओ अल्टिमीटर.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : तेजस लढाऊ विमान
• तेजस → भारताचे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान
• जागतिक विक्रम- जगातील सर्वात 'हलके लढाऊ विमान' (Light Combat Aircraft)
• निर्मिती → हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
• तेजस कोणत्या जुन्या विमानांची जागा घेणार आहे → रशियाच्या MiG-21
• पिढी → 4.5 Generation























