
चालू घडामोडी | चालू घडामोडी | भारत-फ्रान्स ATL ब्रिज | अटल इनोव्हेशन मिशन 2026

India–France ATL Bridge
📚 Subject : GS - आंतरराष्ट्रीय करार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) "भारत इनोव्हेट्स 2026" परिषदेदरम्यान जाहीर झालेला 'भारत-फ्रान्स एटीएल ब्रिज' (The India–France ATL Bridge) हा उपक्रम प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
- सागरी सुरक्षा आणि युद्धनौका विकास
- दोन्ही देशांमधील कृषी व्यापार वाविणे
- अंतराळ संशोधनासाठी उपग्रह प्रक्षेपण
- शालेय स्तरावरील शिक्षण, विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञान
उत्तर : शालेय स्तरावरील शिक्षण, विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञान
📰 बातमी काय ?
• फ्रान्समधील नाईस (Nice) येथे पार पडलेल्या 'भारत इनोव्ह्हेट्स 2026' (Bharat Innovates 2026) शिखर परिषदेदरम्यान 'भारत-फ्रान्स एटीएल ब्रिज' (India–France ATL Bridge) या उच्च-स्तरीय द्विपक्षीय शैक्षणिक आणि तंत्रज्ञान कॉरिडॉरची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे.

🧐 'भारत-फ्रान्स एटीएल ब्रिज' काय आहे ?
1) स्वरूप - हा एक आंतरराष्ट्रीय कॉरिडॉर आणि क्रॉस-बॉर्डर प्लॅटफॉर्म आहे, जो भारत आणि फ्रान्समधील शालेय स्तरावरील नवसंशोधक (School-Level Innovators), शिक्षक आणि तांत्रिक चौकटींना (Technology Frameworks) एकमेकांशी जोडतो.
2) प्रमुख भागीदार (Stakeholders) - या उपक्रमाची स्थापना भारतातील 'अटल इनोव्हेशन मिशन' (नीति आयोग, भारत सरकार) आणि फ्रान्समधील 'ला फौंडेशन डॅसॉल्ट सिस्टीम्स' (La Fondation Dassault Systèmes) यांच्यातील संयुक्त भागीदारीतून करण्यात आली आहे.
3) मुख्य ध्येय - शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातच अभियांत्रिकी (Engineering), वैज्ञानिक दृष्टिकोन (Scientific Temper) आणि डिझाईन थिंकिंगचा प्रसार करणे.
• भारताच्या तळागाळातील 'टिंकरिंग' (Tinkering) पद्धतीचा परदेशात विस्तार करून दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांवर एकत्र काम करण्यासाठी प्रवृत्त करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
⛳️ उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये -
1) भारताच्या ATL मॉडेलची फ्रान्समध्ये प्रतिकृती - या उपक्रमांतर्गत भारताच्या अटल टिंकरिंग लॅब (ATL) मॉडेलची प्रतिकृती तयार करून फ्रान्समधील पहिली 'स्कूल इनोव्हेशन लॅब' स्थापन केली जात आहे, ज्याद्वारे कृतीतून शिकण्याला (Hands-on learning) चालना मिळेल.
2) क्रॉस-बॉर्डर उद्योजकता साखळी - विद्यार्थी आदानप्रदान (Student exchanges) आणि मार्गदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा संशोधकांना जागतिक तज्ञांशी जोडले जाईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योजकतेला गती मिळेल.
3) प्रगत तांत्रिक क्षेत्रे - या लॅब्जच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), 3D प्रिंटिंग, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि डिझाईन थिंकिंग यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• उपक्रमाचे नाव → भारत-फ्रान्स ATL ब्रिज (India–France ATL Bridge).
• स्थापनेचे अधिकृत व्यासपीठ → भारत इनोव्ह्हेट्स 2026 शिखर परिषद (नाईस, फ्रान्स).
• भारताची सहभागी संस्था → अटल इनोव्हेशन मिशन (नीति आयोग )
• फ्रान्सची सहभागी संस्था → ला फौंडेशन डॅसॉल्ट सिस्टीम्स (La Fondation Dassault Systèmes)
• मुख्य तांत्रिक आकर्षण → फ्रान्समध्ये भारताच्या धर्तीवर पहिली 'स्कूल इनोव्हेशन लॅब' (ATL Model) स्थापन करणे
• समाविष्ट प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रे → रोबोटिक्स, AI, 3D प्रिंटिंग आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स

























