
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन
International Day for Countering Hate Speech
📚 Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र - मूलभूत हक्क
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन ' केव्हा साजरा केला जातो ?
- 8 जून
- 5 जून
- 12 जून
- 18 जून
उत्तर : 18 जून
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 18 जून रोजी आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन साजरा केला जातो.
🧐 द्वेषयुक्त भाषण म्हणजे काय ?
• द्वेषयुक्त भाषण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा गटाचा त्यांच्या ओळखीच्या आधारावर अपमान करणे किंवा त्यांना कलंकित करणे. जसे की धर्म, वंश, लिंग, राष्ट्रीयत्व इत्यादी.
• द्वेषयुक्त भाषण हिंसाचाराला उत्तेजन देऊ शकते, भेदभाव वाढवू शकते आणि सामाजिक एकता बिघडू शकते.
• द्वेषयुक्त भाषणामुळे मोठ्या प्रमाणावर दंगे होतात, मानवी हक्कांचे उल्लंघन होते.
• द्वेषयुक्त भाषणामुळे समुदाय आणि राष्ट्रांमध्ये संघर्ष आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
🤔 आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन का साजरी करतात ?
• या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट द्वेषयुक्त भाषणाच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
• तसेच सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था, नागरी समाज गट आणि व्यक्तींना द्वेषयुक्त भाषण ओळखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी प्रेरित करणे हे आहे.
• द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
• हा दिवस सर्वसमावेशक आणि सहिष्णु समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
✍️ आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिनाचा ठराव कोणी आणि का मंजूर केला ?
• संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने "जगभरात द्वेषपूर्ण भाषणाचा वाढता प्रसार आणि प्रचार" याबद्दल जागतिक चिंता अधोरेखित केल्या.
• संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने "द्वेषपूर्ण भाषणाचा प्रतिकार करण्यासाठी आंतर-धार्मिक आणि आंतरसांस्कृतिक संवाद आणि सहिष्णुतेला प्रोत्साहन देणे" यावर एक ठराव मंजूर केला.
• या ठरावानुसार 18 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
🤔 पहिला 'आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन ' 18 जून 2022 रोजी केव्हा साजरी करण्यात आला ?
• पहिला 'आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन ' 18 जून 2022 रोजी साजरा करण्यात आला.
🧐 2026 या वर्षीच्या 'आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिनाची ' संकल्पना (थीम) कोणती ?
• द्वेषयुक्त भाषणाचा मुकाबला करण्यासाठी भागीदारीची ताकद ("The Power of Partnerships in Countering Hate Speech") ही यंदाची थीम आहे.

📚 राज्यशास्त्र संदर्भ :
⚖️ भारतीय संविधान - मूलभूत हक्क आणि बंधने
• भारतीय कायद्यात 'Hate Speech' ची कोणतीही एक स्पष्ट व्याख्या नाही, परंतु संविधानात आणि कायद्यात खालील नियंत्रणे आहेत:
✍️ कलम 19(2) (वाजवी बंधने) - कलम 19(1)(a) ने नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, परंतु कलम 19(2) अंतर्गत देशाचे सार्वभौमत्व, सार्वजनिक सुव्यवस्था आणि सदाचार राखण्यासाठी त्यावर वाजवी बंधने (Reasonable Restrictions) घालण्यात आली आहेत.
• बंधने घालण्याचे एकूण आधार → संविधानानुसार एकूण 8 आधार आहेत, ज्यांचा वापर करून सरकार तुमच्या बोलण्यावर/लिहिण्यावर बंदी घालू शकते.
• 8 वैधानिक आधार खालीलप्रमाणे आहेत:
1. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता (Sovereignty and Integrity of India)
2. राज्याची सुरक्षा (Security of the State)
3. परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध (Friendly relations with foreign States)
4. सार्वजनिक सुव्यवस्था (Public Order)
5. सभ्यता किंवा नैतिकता (Decency or Morality)
6. न्यायालयाचा अवमान (Contempt of Court)
7. अब्रूनुकसानी (Defamation)
8. गुन्ह्याला चिथावणी देणे (Incitement to an offence)

✍️ चालू घडामोडींशी लिंक (Current Link) → सोशल मीडियावरील द्वेषयुक्त भाषण (Hate Speech) किंवा खोट्या अफवांवर कारवाई करताना सरकार याच कलम 19(2) मधील 'सार्वजनिक सुव्यवस्था' आणि 'सदाचार' या आधारांचा वापर करते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : International Day for Countering Hate Speech
• आंतरराष्ट्रीय द्वेषयुक्त भाषण विरोधी दिन → 18 जून
• पहिली आवृत्ती / सुरुवात → 18 जून 2022
• वर्ष 2026 ची संकल्पना (Theme) → "The Power of Partnerships in Countering Hate Speech".
• भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य → भारतीय संविधान: कलम 19(1)(a)
• अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील वाजवी बंधने → भारतीय संविधान: कलम 19(2)
• कलम 19(2) मधील बंधनांचे एकूण आधार → 8 वैधानिक आधार (उदा. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता सार्वजनिक सुव्यवस्था, अब्रूनुकसानी).

























