
चालू घडामोडी | 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026
Mumbai International Film Festival (MIFF) 2026
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वर्ष 2026 मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे' (MIFF) आयोजन खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे ?
- राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC)
- चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII)
- राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI)
- केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC)
उत्तर : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC)
📰 बातमी काय ?
• भारतातील लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठीचा अत्यंत मानाचा समजला जाणारा 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) नुकताच मुंबई येथे सुरू झाला आहे.

🧐 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) नक्की काय आहे ?
• अभिमानास्पद वारसा — हा चित्रपट महोत्सव अ-कथानक (Non-Feature Films) चित्रपटांसाठीचा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि मोठा चित्रपट महोत्सव आहे.
• आयोजक संस्था — हा महोत्सव केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry of Information and Broadcasting) अखत्यारीत असणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) द्वारे आयोजित केला जातो.
🤔 यावर्षीच्या 19व्या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे ?
• AI-जनरेटेड चित्रपट — डिजिटल आणि सिनेमाच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करून, यंदाच्या महोत्सवात पारंपरिक डॉक्युमेंट्री, लघुपट (Short Fiction) आणि ॲनिमेशन सोबतच 'AI-जनरेटेड चित्रपट' (AI-Generated Films) या नवीन प्रकारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
• मुख्य उद्देश — जगभरातील चित्रपट निर्मात्यांना सामाजिक दृष्ट्या प्रासंगिक, नाविन्यपूर्ण आणि प्रायोगिक चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे हा आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Mumbai International Film Festival (MIFF) 2026
• महोत्वाची आवृत्ती → 19 वी आवृत्ती (19th Edition)
• आयोजनाचे ठिकाण → मुंबई (Mumbai)
• आयोजक संस्था → राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC)
• संबंधित मंत्रालय → केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय (Ministry of Information and Broadcasting)
• महोत्सवाचे कार्यक्षेत्र → माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन आणि AI-जनरेटेड चित्रपट
• विशेष मान → दक्षिण आशियातील अ-कथानक चित्रपटांसाठीचा सर्वात जुना आणि मोठा महोत्सव
























