
चालू घडामोडी | हिंद महासागर नौदल परिसंवाद

Indian Ocean Naval Symposium
Subject : GS - जागतिक संघटना, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, ------ देशाने हिंद महासागर नौदल परिसंवाद (Indian Ocean Naval Symposium -IONS) 2026 चे अध्यक्षपद स्वीकारले.
1. भारत
2. चीन
3. इंडोनेशिया
4. सिंगापूर
उत्तर : भारत
📰 बातमी काय ?
• फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या 9 व्या Conclave of Chiefs दरम्यान भारतानीय भारतीय नौदलाने महासागर नौदल परिसंवाद (Indian Ocean Naval Symposium -IONS) चे अध्यक्षपद स्वीकारले.
🤔 Indian Ocean Naval Symposium (IONS) म्हणजे काय ?
• IONS हा एक स्वैच्छिक, समावेशक आणि बहुपक्षीय सागरी मंच आहे, ज्याद्वारे भारतीय महासागर क्षेत्रातील विविध देशांच्या नौदलांमध्ये सहकार्य वाढवले जाते.
• याची सुरुवात 2008 मध्ये भारतीय नौदलाने केली.
⚙️ कार्यपद्धती :
✍️ IONS अंतर्गत विविध देशांचे नौदल खालील प्रकारे सहकार्य करतात —
• संयुक्त सराव आणि प्रशिक्षण
• व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण
• मानवतावादी मदत व आपत्ती व्यवस्थापन (HADR)
• सागरी सुरक्षा व समन्वय
हिंद महासागर नौदल परिसंवाद (IONS) चे वैशिष्ट्ये :
• स्थापना : 2008
• सुरुवात : भारतीय नौदल
• सदस्य : सुमारे 25 देश (IOR क्षेत्रातील)
• भारताने 2008–2010 दरम्यान पहिले अध्यक्षपद सांभाळले होते आणि 2026 मध्ये पुन्हा अध्यक्षपदी. यामुळे भारताची सागरी नेतृत्व भूमिका मजबूत होते
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : हिंद महासागर नौदल परिसंवाद (IONS)
✍️ 2026 → भारताने IONS चे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले
📍 ठिकाण → विशाखापट्टणम (9 वा Conclave of Chiefs)
🏛️ IONS स्थापना → 2008 (भारतीय नौदल)
🌊 स्वरूप → बहुपक्षीय सागरी मंच
👥 सदस्य → सुमारे 25 देश
🎯 उद्देश → सागरी सुरक्षा, सहकार्य व स्थैर्य
🇮🇳 भारत → संस्थापक + पुन्हा अध्यक्ष (2026)

















