
चालू घडामोडी | भारत विस्तार योजना

Bharat VISTAAR Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न 1) ‘भारत विस्तार’ (Bharat VISTAAR) योजना संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1. ही योजना शेतकऱ्यांना थेट आर्थिक अनुदान देण्यासाठी आहे
2. ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी सल्ला प्रणाली आहे
3. ही योजना फक्त महिला शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे
4. ही योजना कृषी जनगणना करण्यासाठी वापरली जाते
उत्तर : ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी सल्ला प्रणाली आहे
📰 बातमी काय ?
• 'कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय' (Ministry of Agriculture & Farmers Welfare) ने राजस्थानातील जयपूर येथे ‘भारत विस्तार’ योजनेचा पहिला टप्पा सुरू केला.
• ही योजना शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून वैयक्तिक कृषी सल्ला देऊन त्यांना सक्षम बनवण्यावर भर देते.
• या शुभारंभासोबतच, कृषी तंत्रज्ञानातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी-केंद्रित एआय हॅकाथॉन आणि ॲग्री कोश एआय स्ट्रॅटेजी रोडमॅपचे अनावरण करण्यात आले.
भारत विस्तार योजना काय आहे ?
✍️ Bharat-VISTAAR फूल फॅार्म - Virtually Integrated System To Access Agricultural Resources
• ही एक बहुभाषिक (Multilingual) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संवादात्मक सल्ला प्रणाली (Conversational Advisory System) आहे.
• शेतकरी आपल्या स्थानिक भाषेत प्रश्न विचारू शकतात आणि तत्काळ उत्तर मिळते.
🎯 उद्दिष्ट :
• शेती अधिक सुलभ, परवडणारी आणि तंत्रज्ञानाधारित करणे.
• शेतकऱ्यांना वैयक्तिक (Personalised) सल्ला देऊन आत्मनिर्भरता वाढवणे.
📞 हेल्पलाईन सुविधा :
• शेतकरी 155261 या क्रमांकावर संपर्क करून माहिती मिळवू शकतात.
• सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत सेवा उपलब्ध असून लवकरच 11 भाषांमध्ये विस्तार होणार आहे.
🔗 एकत्रित व्यासपीठ (Integrated Platform) :
✍️ ही प्रणाली खालील घटक एकत्र आणते :
• AgriStack – डिजिटल कृषी माहिती प्रणाली
• Indian Council of Agricultural Research – कृषी संशोधन माहिती
• India Meteorological Department – हवामान अंदाज व माहिती
• बाजारभाव आणि शासकीय योजना
🪪 शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) :
• डिजिटल शेतकरी ओळखपत्र तयार केले जाईल.
• यामध्ये शेतकऱ्यांची माहिती साठवली जाईल आणि विविध योजना जोडल्या जातील जसे की - प्रधानमंत्री फसल बीमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana), मृदा आरोग्य पत्रिका योजना (Soil Health Card Scheme) इत्यादी.
🌾 सेवा (Services) :
• मृदा परीक्षण, बियाणे, खते, सिंचन, कर्ज, विमा याबाबत मार्गदर्शन दिले जाते.
• यामध्ये देशभरातील प्रत्यक्ष बाजारभाव (मंडी दर) पाहता येतात.
• यामुळे उत्पादन वाढते आणि जोखीम कमी होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• योजना – भारत विस्तार (Bharat VISTAAR)
• स्वरूप – कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्ला प्रणाली
• लॉन्च – जयपूर (राजस्थान)
• मंत्रालय – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
• हेल्पलाईन – 155261
• बहुभाषिक सेवा



















