
चालू घडामोडी | विशेषाधिकार भंगाची नोटीस

Breach of Privilege Notice
Subject : GS - राज्यशास्त्र - संसद
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय राज्यघटनेतील ‘विशेषाधिकार भंगाची नोटीस (Breach of Privilege Notice)’ संदर्भातील योग्य विधान कोणते ?
1. ही न्यायालयाकडून दिली जाणारी नोटीस आहे
2. ही खासदाराने सभागृहातील विशेषाधिकार भंग झाल्याचा आरोप करण्यासाठी दिलेली नोटीस आहे
3. ही फक्त राज्य विधानसभेसाठी लागू असते
4. ही फक्त मंत्र्यांनाच लागू असते
उत्तर : ही खासदाराने सभागृहातील विशेषाधिकार भंग झाल्याचा आरोप करण्यासाठी दिलेली नोटीस आहे
बातमी काय ?
• केंद्र सरकारने लोकसभेतील अर्थसंकल्प चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्याने (LoP) दिशाभूल करणारी विधाने केल्याचा आरोप करत
त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस (Privilege Notice) आणण्याची घोषणा केली आहे.
विशेषाधिकार म्हणजे काय ?
• विशेषाधिकार (Parliamentary Privileges) म्हणजे संसद आणि तिच्या सदस्यांना दिलेले काही विशेष हक्क व संरक्षण होय.
• हे हक्क यासाठी दिलेले असतात की सदस्यांना कोणत्याही भीतीशिवाय, अडथळ्याशिवाय आणि दबावाशिवाय आपली कर्तव्ये पार पाडता येतील.
✍️ उदाहरणार्थ -
• सभागृहात मुक्तपणे बोलण्याचा अधिकार
• कलम 105(2) नुसार - संसदेत बोललेले किंवा दिलेले मत यासाठी सदस्यांवर न्यायालयात कारवाई होऊ शकत नाही.
विशेषाधिकार भंगाची नोटीस म्हणजे काय ?
What is the meaning of Breach of Privilege Notice ?
• विशेषाधिकार नोटीस म्हणजे एखाद्या खासदाराने अशी तक्रार करणे की सभागृहाचे किंवा सदस्यांचे विशेषाधिकार भंग झाले आहेत.
• तर त्याला विशेषाधिकार भंग (Breach of Privilege) म्हणतात आणि त्यावर ही नोटीस दिली जाते.
🧐 विशेषाधिकार भंगाची नोटीस कधी दिली जाते ?
✍️ खालील परिस्थितीत नोटीस दिली जाऊ शकते :
• सभागृहाला चुकीची/दिशाभूल करणारी माहिती देणे
• सदस्यांच्या कामात अडथळा आणणे
• संसद किंवा सदस्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणे
• चुकीची किंवा बदललेली माहिती प्रकाशित करणे
• सभागृहाचा अपमान (Contempt of House)
📖 घटनात्मक तरतूद :
• कलम 105 → संसद व सदस्यांचे विशेषाधिकार
• कलम 194 → राज्य विधानसभांच्या सदस्यांच्या विशेषाधिकारांशी संबंधित
• कलम 122 → संसदीय कार्यवाहीवर न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही
📖 विशेषाधिकार भंगाची नोटीस प्रक्रिया (Procedure) :
1. खासदार लेखी नोटीस सभापती /अध्यक्ष यांना देतो
2. ते ठरवतात की नोटीस स्वीकारायची की नाही
3. स्वीकारल्यास
4. थेट सभागृहात चर्चा, किंवा
5. Privilege Committee कडे पाठवली जाते
6. समिती अहवाल देते
7. सभागृह अंतिम निर्णय घेतो
शिक्षा (Punishment Powers) :
✍️ सभागृहाला खालील शिक्षा देण्याचा अधिकार आहे :
• इशारा (Admonition)
• तंबी (Reprimand)
• निलंबन (Suspension)
• सदस्यत्व रद्द (Expulsion)
• तुरुंगवास (Imprisonment)
महत्त्व :
• संसदची प्रतिष्ठा व अधिकार टिकवून ठेवते
• सदस्यांना जबाबदार बनवते
• सभागृहातील शिस्त आणि नियम पाळले जातात
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : विशेषाधिकार
• विशेषाधिकार → संसद सदस्यांचे विशेष हक्क व संरक्षण
• कलम 105 → संसद व सदस्यांचे विशेषाधिकार
• कलम 194 → राज्य विधानसभांच्या सदस्यांच्या विशेषाधिकारांशी संबंधित
• कलम 122 → संसदीय कार्यवाहीवर न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही
• Privilege Notice → विशेषाधिकार भंगाची खासदाराकडून तक्रार
• सभापती /अध्यक्ष ठरवतात नोटीस स्वीकारायची की नाही
• तपास — Privilege Committee

















