
चालू घडामोडी | ‘डॉर्नियर 228’ विमान

Dornier 228 Aircraft
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय तटरक्षक दलासाठी ‘डॉर्नियर 228 (Dornier 228)’ विमानांची खरेदी कोणत्या कंपनीकडून करण्यात येत आहे ?
1. एअरबस
2. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
3. लॉकहीड मार्टिन
4. बोईंग
उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
बातमी काय ?
• संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत ₹2,312 कोटींचा करार केला आहे.
• या अंतर्गत भारतीय तटरक्षक दलासाठी आठ, डॉर्नियर 228 विमानांची खरेदी करण्यात येणार आहे.
डॉर्नियर 228 म्हणजे काय ?
• डॉर्नियर 228 हे एक दुहेरी इंजिन असलेले टर्बोप्रॉप (turboprop) विमान आहे.
• हे विमान लहान धावपट्ट्यांवरून (STOL) उड्डाण व लँडिंग करू शकते, त्यामुळे दुर्गम आणि किनारी भागात वापरण्यास उपयुक्त आहे.
✍️ डॉर्नियर 228 हे विमान खालील कामांसाठी वापरले जाते :
• सागरी गस्त (Maritime Patrol)
• सीमा व किनारपट्टी निरीक्षण
• शोध व बचाव मोहीम (Search & Rescue)
• वाहतूक (Transport)
डॉर्नियर 228 विमानांचे उत्पादन व विकास :
• मूळ विकास — जर्मनीतील Dornier GmbH
• भारतात उत्पादन — हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड - HAL (कानपूर युनिट)
• सध्या भारतात स्वदेशी उत्पादन (license production)
✍️ डॉर्नियर 228 विमानाचे प्रमुख वैशिष्ट्ये :
क्षमता :
• हे विमान 15 ते 19 प्रवासी किंवा त्याच प्रमाणात माल वाहून नेऊ शकते.
इंजिन :
• Twin turboprop engines (Garrett TPE331)
• इंधन कार्यक्षम आणि विविध हवामानात कार्यक्षम
Short Take-Off and Landing (STOL) क्षमता :
• लहान व कच्च्या धावपट्ट्यांवरून उड्डाण/लँडिंग शक्य
• दुर्गम भागांसाठी अत्यंत उपयुक्त
उड्डाण क्षमता (Endurance) :
• साधारण 5–6 तास सतत उड्डाण क्षमता
आधुनिक तंत्रज्ञान (NG Variant) :
• Glass cockpit, डिजिटल डिस्प्ले व autopilot सुविधा
• आधुनिक नेव्हिगेशन प्रणालीमुळे वैमानिकाला आसपासची परिस्थिती स्पष्टपणे समजते आणि उड्डाण अधिक सुरक्षित होते. त्यामुळे हे विमान एका वैमानिकाद्वारेही सहजपणे चालवता येते.
सागरी उपकरणे :
• 360° रडार, इन्फ्रारेड सेन्सर्स
• रिअल-टाइम डेटा ट्रान्समिशन
✍️ Dornier 228 विमानाचे महत्त्व :
सागरी सुरक्षा मजबूत करणे :
• भारतीय तटरक्षक दलाला किनारपट्टी व EEZ निरीक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल.
स्वदेशी उत्पादनाला चालना देणे :
• हा करार Buy (Indian) श्रेणीत असल्यामुळे भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्राला बळकटी मिळते.
रोजगार निर्मिती करणे :
• Hindustan Aeronautics Limited आणि संबंधित उद्योगांमध्ये रोजगार व औद्योगिक विकास होतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : डॉर्नियर 228
• डॉर्नियर 228 — टर्बोप्रॉप STOL विमान
• खरेदी — 8 विमान (Indian Coast Guard)
• करार — ₹2,312 कोटी
• कंपनी — HAL (कानपूर)
• उपयोग — सागरी गस्त, शोध व बचाव मोहीम, वाहतूक
• क्षमता — 15–19 प्रवासी
• उड्डाण क्षमता — 5–6 तास



















