
चालू घडामोडी | ओलचिकी लिपीची 100 वर्षे पूर्ण
100 Years of Ol Chiki Script
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, ओल चिकी लिपीची 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकारने एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. तर ही लिपी कोणत्या भाषेची अधिकृत लिपी आहे ?
1. कोकणी
2. संथाली
3. बोडो
4. मुंडारी
उत्तर : संथाली
📰 बातमी काय ?
• भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) कडून 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे ओल चिकी लिपीच्या 100 वर्षांच्या (1925–2025) स्मरणार्थ शताब्दी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
• तसेच ओल चिकी लिपीची 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकारने एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले.
📚 ओल चिकी लिपी म्हणजे काय ?
• ओल चिकी ही संथाली भाषेची अधिकृत लिपी आहे.
• ती इतर लिप्यांपासून घेतलेली नसून पूर्णपणे स्वतंत्रपणे तयार करण्यात आली आहे.
• ही लिपी संथाली भाषेतील ध्वनी अचूकपणे दर्शवते, त्यामुळे भाषिक शुद्धता राखली जाते.
🧐 ओल चिकी लिपी कोणी विकसित केली ?
• 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ओल चिकी लिपी विकसित केली.
• त्यांना संथाली समाजात “Guru Gomke” (महान शिक्षक) म्हणून ओळखले जाते.
• 1936 मध्ये चिकी लिपी लिहिलेले ‘हाई सेरेना’ (High Serena) हे पहिले महत्त्वाचे साहित्य पंडित रघुनाथ मुर्मू यांचे आहे.

📖 ओल चिकी लिपीची वैशिष्ट्ये :
• ओल चिकी लिपीत सुमारे 30 अक्षरे आहेत.
• प्रत्येक चिन्ह एका विशिष्ट ध्वनीचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे उच्चार स्पष्ट होतात.
• यामध्ये संयुक्त अक्षरे नसल्यामुळे रचना सोपी आहे.
🌍 भाषिक व भौगोलिक विस्तार :
• संथाली भाषा झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.
• ही भाषा ऑस्ट्रोएशियाटिक भाषाकुळातील (Austroasiatic Language Family) मुंडा शाखेत येते.
⚖️ घटनात्मक व वर्तमान महत्त्व :
• 2003 मध्ये 92 व्या घटनादुरुस्तीने संथाली भाषेला आठव्या अनुसूचीत स्थान मिळाले.
• डिसेंबर 2025 मध्ये भारतीय संविधानाचे संथाली भाषेत ओल चिकी लिपीत भाषांतर करण्यात आले, ज्यामुळे लोकशाहीचा प्रवेश अधिक व्यापक झाला.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : ओल चिकी लिपी
• 1925 – ओल चिकी लिपीची निर्मिती
• निर्माता – पंडित रघुनाथ मुर्मू
• भाषा – संथाली
• 1936 – ‘हाई सेरेना’ (पहिले साहित्य)
• 2025 – संविधानाचे संथाली भाषेत ओल चिकी लिपीत भाषांतर
• लिपी वैशिष्ट्य – “एक चिन्ह = एक ध्वनी”, संयुक्त अक्षरे नाहीत
• भाषाकुळ – ऑस्ट्रोएशियाटिक (मुंडा शाखा)
















