
चालू घडामोडी | ‘कुंभदूत’ म्हणजे काय ?

What is 'Kumbhadoot' ?
Subject : GS - सरकारी योजना, महाराष्ट्र सरकार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सादर करण्यात आलेली ‘कुंभदूत’ संकल्पना कशाशी संबंधित आहे ?
1. कृषी उत्पादन वाढ
2. AI आधारित वैयक्तिक डिजिटल सहाय्यक
3. आरोग्य विमा योजना
4. औद्योगिक विकास प्रकल्प
उत्तर : AI आधारित वैयक्तिक डिजिटल सहाय्यक
🗞️ बातमी काय ?
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘India AI Impact Summit 2026’ मध्ये ‘कुंभदूत’ या एजेंटिक AI आधारित संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले.
• ही संकल्पना नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी विकसित करण्यात येत असून, भाविकांना वैयक्तिक डिजिटल सहाय्यक देण्याचा उद्देश आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप :
• कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असून लाखो-कोटी भाविक एकत्र येतात. त्यामुळे गर्दी, माहितीचा अभाव, भाषा अडथळे आणि व्यवस्थापनातील गुंतागुंत ही मोठी समस्या असते.
उपाय – ‘कुंभदूत’ प्रणाली :
• या समस्यांवर उपाय म्हणून ‘कुंभदूत’ ही प्रणाली विकसित केली जात आहे.
• सिंहस्थ 2027 मध्ये प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला एक वैयक्तिक AI सहाय्यक दिला जाईल.
• या सहाय्यकाचे नाव “कुंभदूत” असेल.
• “कुंभदूत” हा सहाय्यक प्रवास, निवास, घाटांची माहिती, आपत्कालीन मदत, भाषांतर आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या सेवांमध्ये मार्गदर्शन करेल.
“एजेंटिक” AI म्हणजे काय ?
• एजेंटिक AI म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र AI सहाय्यक (Agent) जो त्याच्या वतीने माहिती मिळवतो, सेवा समन्वय करतो आणि निर्णय प्रक्रियेत मदत करतो.
• हा सहाय्यक एजंट शासन, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था किंवा स्थानिक विक्रेते यांच्याशी समन्वय साधतो.
कार्यपद्धती :
• भाविक नोंदणी केल्यानंतर त्याला एक “कुंभदूत” AI सहाय्यक मिळेल.
• हा सहाय्यक मोबाइल, फीचर फोन (IVR कॉल) किंवा किऑस्कद्वारे वापरता येईल.
• संपूर्ण प्रणाली भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित असेल (जसे UPI, DigiLocker).
• महत्त्वाचे म्हणजे, सर्व सेवा भाविकाच्या संमतीवर आधारित असतील आणि कोणताही केंद्रीकृत डेटा साठवला जाणार नाही.
“कुंभदूत” चे वैशिष्ट्ये :
• वैयक्तिक AI सहाय्यक : प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र “कुंभदूत”
• बहुभाषिक सुविधा : 20 पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये सेवा
• सर्वांसाठी उपलब्धता : स्मार्टफोन, साधा फोन (कॉल) आणि किऑस्क
• कुंभ पास : ऐच्छिक डिजिटल पास – DigiLocker मध्ये सुरक्षित
• डिजिटल समन्वय : UPI, आरोग्य सेवा, व्यापारी व शासन विभाग यांचा समावेश
• गोपनीयता : डेटा केवळ संमतीने आणि मर्यादित कालावधीसाठी वापरला जातो
“कुंभदूत” चे महत्त्व :
• ही प्रणाली मोठ्या धार्मिक कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दाखवते.
• गर्दी व्यवस्थापन, सेवा वितरण आणि पारदर्शकता सुधारते.
• भारताच्या “Responsible AI” दृष्टिकोनाला बळकटी मिळते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : “कुंभदूत”
• ‘कुंभदूत’ → एजेंटिक AI आधारित प्रणाली
• उपयोग → सिंहस्थ कुंभमेळा 2027 (नाशिक)
• प्रत्येक भाविकाला → वैयक्तिक AI सहाय्यक
• बहुभाषिक → 20+ भारतीय भाषा
• सर्वांसाठी उपलब्धता : स्मार्टफोन, साधा फोन (कॉल) आणि किऑस्क
• आधार प्रणाली → डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर (UPI, DigiLocker)
• गोपनीयता → डेटा केवळ संमतीने



















