
चालू घडामोडी | दलाई लामा यांनी वयाच्या 90 व्या वर्षी जिंकला ग्रॅमी पुरस्कार

Dalai Lama Wins First Grammy Award at Age 90
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2026 मधील 68 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दलाई लामा यांना कोणत्या अल्बमसाठी पुरस्कार मिळाला ?
1. ‘पीस अँड हार्मनी : अ स्पिरिच्युअल जर्नी’
2. ‘माइंडफुल लिव्हिंग : द आर्ट ऑफ कॉन्शसनेस’
3. ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा’
4. ‘इनर पीस : द पाथ ऑफ कम्पॅशन’
उत्तर : ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा’
🗞️ बातमी काय ?
• तिबेटी आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी ६८ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात (२०२६) आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला.

🤔 68 वा ग्रॅमी पुरस्कार २०२6 सोहळा कुठे पार पडला ?
• अमेरिकेच्या लॉस एंजेलिस या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
🧐 दलाई लामा यांना कोणत्या श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला ?
• दलाई लामा यांना 'सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग' (Best Audio Book, Narration, and Storytelling Recording) या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
📖 दलाई लामा यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला ?
• 'मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा' (“Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama”) या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
• 90 वर्षीय आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांना त्यांच्या शांतता आणि मानवी मूल्यांवरील योगदानासाठी पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• विशेष: शांतता, करुणा आणि माइंडफुलनेसवर आधारित या ऑडिओ बुकमध्ये संगीतकार रफस वेनराइट आणि भारतीय शास्त्रीय कलाकार उस्ताद अमजद अली खान व त्यांच्या मुलांचे योगदान आहे.
ग्रॅमी पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे.
• ग्रॅमी पुरस्कार हा संगीतातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे.
• ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो.
• ग्रॅमी पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते.
• पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यू यॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला.
ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ?
(SSC CHSL 2021, SSC MTS 2022, सरळसेवा भरती)
• सतारवादक पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत.
• त्यांना 1968 मध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
"ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड" मिळवणारे पहिले भारतीय कोण ?
(SSC MTS 2022, सरळसेवा भरती)
• सतारवादक पंडित रविशंकर हे "ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड" मिळवणारे पहिले भारतीय संगीतकार आहेत.
• पंडित रविशंकर यांना मरणोत्तर 2013 मध्ये ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) → लॉस एंजेलिस (अमेरिका)
• विजेता → दलाई लामा (वय 90)
• श्रेणी → सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग
• अल्बम → ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा’
• वैशिष्ट्य → शांतता, करुणा आणि माइंडफुलनेस आधारित संदेश



















