
चालू घडामोडी | केंद्राकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पाची भेट

Centre Railway Project to Four States including Maharashtra
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) फेब्रुवारी 2026 मध्ये मंत्रिमंडळाने तीन मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना तसेच 18,509 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या एकंदर खर्चाला मंजूरी दिली. जे कोणत्या चार राज्यांमध्ये / केंद्र शासित प्रदेशांमध्ये विस्तारलेले आहेत ?
1. दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटक
2. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड
3. महाराष्ट्र, गुजरात, चंदिगड आणि पंजाब
4. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि पश्चिम बंगाल
उत्तर : दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटक
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 3 प्रकल्पांना तसेच 18,509 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या एकंदर खर्चाला मंजूरी दिली.
हे प्रकल्प कोणते ?
• पीएम गती शक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्यानुसार या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे.
• हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत-
1. कसारा – मनमाड 3 रा व 4 था रेल्वेमार्ग
2. दिल्ली – अंबाला 3 रा व 4 था रेल्वेमार्ग
3. बल्लारी – होस्पेट 3 रा व 4 था रेल्वेमार्ग
🚉3 रा व 4 था रेल्वेमार्ग म्हणजे काय ?
• 3 रा व 4 था रेल्वेमार्ग म्हणजे सध्याच्या दोन मार्गांच्या अतिरिक्त नवीन रेल्वे रुळ टाकणे होय.
• याचा मुख्य उद्देश मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांची वाहतूक वेगळी करून रेल्वेची क्षमता वाढवणे, गाड्यांचा वेग वाढवणे आणि वाहतूक कोंडी (Traffic Congestion) कमी करणे हा असतो.
🧐 हे प्रकल्प कोणत्या राज्यात विस्तारलेले आहेत ?
• दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 12 जिल्ह्यांमधील या तीन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेमार्गाचा सध्याचा विस्तार 389 किलोमीटरने वाढेल.
या प्रकल्पाचा फायदा काय होईल ?
गावांशी संपर्क :
• या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागाला होणार असून, सुमारे 97 लाख लोकसंख्या असलेल्या 3,902 गावांची संपर्क व्यवस्था सुधारणार आहे.
मालवाहतूक :
• तसेच कोळसा, पोलाद, लोह खनिज, सिमेंट आणि धान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे मार्ग कळीचे ठरणार आहेत, ज्यामुळे प्रतिवर्ष 96 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल.
पर्यावरण :
• पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
• रेल्वे हा वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय असल्याने, या प्रकल्पामुळे 22 कोटी लिटर इंधन आयातीची बचत होईल आणि 111 कोटी किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होईल, जे सुमारे 4 कोटी झाडे लावण्याइतके प्रभावी ठरेल.
रोजगार निर्मिती :
• याशिवाय, बांधकामाच्या काळात सुमारे २६५ लाख मनुष्यबळ दिवस इतकी मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याने स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
पर्यटन विकास : (विशेषतः महाराष्ट्रातील) -
• महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भावली धरण, श्री घाटणदेवी यांसारख्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे जाणारा प्रवास आता अधिक सोयीचा होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : रेल्वे प्रकल्प
• प्रदेश - दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटक
• एकूण प्रकल्प खर्च - ₹18,509 कोटी
• 3 प्रकल्प – कसारा–मनमाड, दिल्ली–अंबाला, बल्लारी–होस्पेट
• 389 किमी – रेल्वे जाळे विस्तार
• 96 दशलक्ष टन – अतिरिक्त मालवाहतूक
• 265 लाख मनुष्यबळ दिवस – रोजगार


















